आंबेवाडी बाजारपेठेतील गटारे, सर्व्हिस रोड तसेच व्हेईकल अंडरपास रस्ते या समस्या विषयी नागरिकांनी दिले निवेदन

Kolad nivedan. road
कोलाड | श्याम लोखंडे 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवरील आंबेवाडी बाजारपेठेतील चौपदरीकरणाच्या काम अनेक वर्षांपासून सुरु असुन या बाजारपेठेतील गटारे,सर्व्हिस रोड तसेच व्हेईकल अंडरपास रस्ता अशा विविध समस्यांन विषयी कोलाड नागरिकांनी मुंबई-गोवा हायवेच्या प्रकल्प संचालकाला निवेदन देण्यात आले.

यावेळी संजय कुर्ले,चंद्रकांत लोखंडे,महेंद्र वाचकवडे,दिपक कुशवाह,राजपाल वर्मा,सागर पाटेकर,सनोज गुप्ता,नगीना यादव,केदार कुशवाह,आकाश घोणे, तसेच व्यापारी संघटना,टेम्पो संघटना,इको संघटना, रिक्षा संघटना, यांचे पदाधिकारी,सदस्य, असंख्य नागरिक उपस्थित होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालक याला दिलेल्या निवेदना असे नमूद करण्यात आले आहे कि आंबेवाडी-वरसगांव हद्दीतील रस्ता रुंदीकरणाचे काम गेली १५ वर्षांपासून सुरु असुन सदर रस्ता रुंदीकरणामध्ये आमच्या जागा,जमिनी,घरे बाधित झाली आहेत. व आपल्या खात्यामार्फत जेव्हा या रस्त्याच्या कामाला सुरवात झाली तेव्हा येथील नागरिकांना विश्वासात न घेता,जनसुनावणी न घेता VUP चे काम चालु केले आहे.सदर या व्हेईकल अंडरपासची लांबी जवळपास १ किमी च्या आसपास आहे.

तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांना,लहान मुलांना, जेष्ठ नागरिकांना एका बाजूला जायचे असल्यास ५०० मिटर अंतरावर चालत जाऊन व्हेईकलच्या खालील रस्त्यावरून जावे लागणार आहे.रस्त्याच्या एका बाजूला PHC सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी,जि.प. शाळा,जेष्ठ नागरिक सभागृह,सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कार्यालय,येथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.यासाठीआम्हांला दोन छोटे बॉक्स टाईप VUP दोन्ही बाजूला येण्याजाण्यासाठी आपल्यकडून मिळावे

तसेच आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील काम गतवर्षांपासून चालु झाले असुन सर्व्हिस रोड ते गटार यामधील एक मीटर जागेमध्ये आम्हाला डांबरीकरण करून मिळावा व सदर गटाराला रेफलेक्टर बोर्ड सुद्धा लावून मिळावे. अशी सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *