आंबा वाहतूक करणारा टेम्पो भर रस्त्यात पलटी, एक जण जखमी

Tempo Accident
महाड :
आंब्याच्या पेट्या आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जाणाऱ्या टेम्पोचा एक्सल तुटून झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड जवळ केभुर्ली येथे घडली.
मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केट मधून आंब्याच्या पेट्या खाली करून पुन्हा खेड तालुक्यात आंबा आणण्यासाठी एम एच झिरो आठ 55 83 या क्रमांकाचा टेम्पो भरधाव वेगात जात असताना मार्ग क्रमांक 66 वरील महाड तालुक्यातील केभुर्ली गावाजवळ भरधाव वेगात असणाऱ्या टेम्पोचा एक्सल तुटून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेम्पो पलटी होऊन या टेम्पोचा चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली ही घटना कळतात महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दंडे व वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विश्वास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *