पेण ( राजेश प्रधान ) : यांच्या अष्टविनायक कला अकादमी, माणगांवच्या पुढाकाराने अकादमीचे अध्यक्ष डॉ. अजय आत्माराम मोरे यांच्या प्रयत्नाने माणगांव येथे प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२४ रोजी, सायं ठीक ६.०० वा. अल्ताफदादा धनसे मैदान, मोर्बा रोड, माणगांव येथे धमाल विनोदी कौटूंबिक कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम (लाईव्ह) सादर होणार आहे.
या धमाल विनोदी कार्यक्रमास पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, माणगांवचे प्रमुख नेते अँड. राजीवजी साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पवार, जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांत, तहसीलदार, पोलिसनिरीक्षक, माजी नगराध्यक्ष आनंद यादव तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, उद्योग या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील कलाकार आपल्या लोकप्रिय अभिनयातून रायगडकरांची मने जिंकणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे ‘रायगड रत्न कला गौरव २०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर धमाल विनोदी व कौटुंबिक आवडता कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सांयकाळी ठीक ७.०० वा सुरु करण्यात येईल. सदर कार्यक्रम अडीच तास रंगणार आहे.
या कार्यक्रमाला विनोदी अभिनेते हास्य सम्राट व प्रमुख कलाकार समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब, चेतना भट, वनिता खरात, अरुण कदम, प्रभाकर मोरे, ओंकार राऊत, शामसुंदर राजपूत, पृथ्वीक प्रताप, प्रथमेश – श्रमेश आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री व कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी हजर राहुन कला सादर करणार आहेत.
कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपाचा असल्याने सदर कार्यक्रमाचा खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने हा कार्यक्रम देणगी, जाहिरात व लोकवर्गणीतून (प्रवेश देणगी सन्मानिका) यातुन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास मुंबई, पुणे, पनवेल, अलिबाग, पेण, तळा, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, दापोली, मंडणगड, खेड, पोलादपूर, बिरवाडी, महाड, पाली, खालापुर तसेच माणगांव तालुक्यातून सुमारे पंधरा हजारहून अधिक हौशी व दर्दी नाट्य रसिक उपस्थित राहणार आहेत.
तरी सदर कार्यक्रम मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रातील भव्य दिव्य स्वरूपाचे असून रायगड मधील जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी आपल्या कुटूंबासह सदर कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन माणगाव मधील सांस्कृतिक कार्य चळवळीचे कार्यकर्ते डॉ. अजय आत्माराम मोरे यांच्या अष्टविनायक कला अकादमी, माणगांव या संस्थेमार्फत व आयोजक यांच्या मार्फत करण्यात येत आहे.