अविनाश भोईर यांच्या वाढदिवसा निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Shibir
कर्जत-ग्रामीण (मोतीराम पादीर) : 
सामाजिक कार्यकर्त्या तेजस्वी अविनाश भोईर यांनी आपले पती युवा समाज प्रबोधनकार,शिवक्रांती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य,कर्जत तालुका अध्यक्ष अविनाश सीताबाई रामचंद्र भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त वारे ग्रामपंचायत हद्दी मधील नवसुचीवाडी,कुरंग, हऱ्याचीवाडी,जांभूळवाडी, या गावातील आदिवासी माता-भगिनी व बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
शिबिराचे उद्धाटन डॉ. विवेक भगत,युवा व्याख्याते अविनाश भोईर, मुख्याध्यापक पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ.भगत यांनी भोईर दांपत्याच्या समाजसेवेचे कौतुक करताना आजच्या काळात वाढदिवस पार्टी,मौजमजा असा कल असताना सामाजिक उपक्रमातून तो साजरा करणे ही प्रेरणादायी असते असे सांगितले.
या शिबिरासाठी नेरळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.वैद्यकीय सेवेसाठी डॉ. विवेक भगत,डॉ. क्षितिजा ढोले,राही परब, राजेंद्र भोईर,डॉ आदेश शिंदे,डॉ.गणेश खताले,तृप्ती काटे,यांनी आरोग्य शिबिरासाठी योगदान दिले.तसेच विनोद भोईर वारे,डॉ विशाल केवारी प्राथमिक आरोग्य केंद्र कळंब,सुरेश केवारी, हनुमान सराई, शिवाजी कडाळी,अशा सेविका भागु कडाळी,विमल पारधी, वनिता भालेराव,यांचे सहकार्य लाभले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद कांबरी यांनी केले.रा.जि.प.प्राथमिक शाळा नवसुचीवाडीचे मुख्याध्यापक पवार सर, जाधव सर,तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला या शिबिराचा ८० नागरिकांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *