अवकाळी पावसामुळे भातशेती संकटात, बळीराजा चिंतेत

Zodani Avakalee Paaus
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
रोहा तालुक्यातील उन्हाळी रब्बी हंगामाच्या पिकाला अवकाळी पावसाने झोडपले त्यामुळें बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे त्याचे नुकसान होताना दिसत आहे.
ईडा पीडा टळू दे बळीचे राज्य येऊदे ही म्हण आता इतिहासातील म्हण केवळ म्हणावं लागेल एवढेच नव्हे तर आता या ना त्या कारणाने शेतकरी बळीराजा अधिक संकटात सापडला जात आहे. मागील काळात आधी कोरोना मग तीन जुनचा चक्रीवादळ तोक्ते वादळ त्यामुळे काही ना काही ही संकटे बळीराजाच्या मागे कायम आहेतच त्यातुनच शेतकरी सावरतो ना सावरतो तोच तडाखा पुन्हा या वर्षीच्या उन्हाळी भात पिकाला अवकाळी पावसाच्या रूपातून पुनः बसत असल्याने आता बळीराजा चिंतेत पडला आहे. गेली दोन तीन दिवस तालुक्यांतील कोलाड खांब वरसगाव सह काही भागात वादळ वाऱ्यासह तुफान पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाची अधिक चिंता वाढवत बळीराजा संकटात सापडला आहे.
संपूर्ण जगाचा पोशिंदा समजला जाणारा व सर्वांची भूक भागवणार बळीराजा आणि तोच नेहमी संकटात आल्याने साऱ्यांचे अश्रू अनावर होत असताना दिसत आहेत. रोहा तालुक्यातील कोलाड-खांब,तिसे,परिसरातील शेतकऱ्यांचे या तुफान पडलेल्या अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेल्या भातशेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन गु्रांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करावे अशी मागणी बळीराजा शेतकरी वर्गातून केली जाते. तालुक्यातील कोलाड-खांब परिसरातील कोलाड, महादेववाडी, हेटवणे, वरसगाव, चिंचवली, तिसे, पुई, गोवे, मूठवली, शिरवली, पुगांव, खांब, नडवली व या परिसरातील शेतकरी कुंडलिकेच्या डोळवहाल चिंचनातून व कोलाड पाटबंधारे विभागाच्या काळव्याच्या पाण्यावर दुबार भात शेतीचे पीक घेतले जाते तर पिकवली जाणारी भातशेतीचे गेली दोन दिवस दुपारनंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. या परिसरातील भातशेती ही कोलाड पाटबंधारे विभाग यांच्या मार्फत सोडण्यात येणाऱ्या कालव्याच्या पाण्यावर भातशेती केली जाते ते पीक देखील चांगले आले त्याची कापणी बांधणी मलनीचे काम शेतकरी यांच्याकडून सूरू आहे मात्र अवकाळी होत असलेल्या पावसामुळे मोठे नुकसान होत असताना दिसत आहे.
गेली काही दिवस उष्णतेचा पारा 42 अंशाहुन अधिक असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते त्यात आज सोमवारी, मंगलवार , बुधवारी देखील पावसाने हुकूमत गाजवत गुरूवारी देखिल आभाळ वातावरण ढगाळ असल्याचे दिसून येत होते नंतर पुन्हा अचानक वादळी वाऱ्यासह रोहा तालुक्यांतील कोलाड आणि परिसरात खांब, कोलाड, वरसगाव, तिसे, तळवली परीसरात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा देत पर्जन्यवृष्टी केली तसेच मुंबई गोवा मार्गा लगतच्या गाव हद्दीत जोरदार पाऊस झाला असल्याने उन्हाळी भात पीक तसेच आंबे, काजू फलबगा तसेच रानमेव्याचे मोठे नुकसान झाले आहे.
येथील कालव्याच्या पाण्यावर केली जाणारी भातपिके उत्तम प्रकारे आली व पावासाला सुरु होण्यास पंधरा ते वीस दिवस शिल्लक असल्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांनीभातशेतीची कापणी, बांधणी केली केली परंतु अवकाळी आलेल्या तौक्ते चक्रीवादळ व तुफान झालेला पाऊस यामुळे कापून बांधून ठेवलेल्या भातपिकात पाणीच पाणी साचल्याने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबरोबर पावसाला हंगामात चार महिने पुरणारी गु्रांची वैरण अथवा चारा पेंडा हे ही भिजल्यामुळे गु्रांच्या वैरणीचा प्रश्न ही बळीराजा समोर गंभीर बनला असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढल्याने बळीराजा दुखावला असल्याचे दिसून येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *