अभिषेक घोसाळकरांचं पार्थिव पाहून पत्नी आणि वडिलांनी फोडला टाहो !

Ghosalkar1
मुंबई : अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसभाईने केलेल्या गोळीबारात यांचा मृत्यू झाला. ज्यावेळी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव घराच्या खाली आणण्यात आलं तेव्हा त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी टाहो फोडला. तर अभिषेक घोसाळकर यांची पत्नी आणि मुलगी या दोघींच्या डोळ्यातले अश्रूही थांबत नव्हते.
नेमकी घटना
मुंबईतल्या दहिसर भागात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नाव्चाय स्वयंघोषित नेत्याने आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुरुवारी रात्री त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तातडीने अभिषेक घोसाळकर यांना करुणा रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसने स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.
 गोळ्या झाडून संपवलं
अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान हत्या झाली. मुंबईतील दहिसर इथले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी ८ फेब्रुवारी रात्री ८ च्या सुमारास हा गोळीबार केला. यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. फेसबुक लाईव्हदरम्यान हा सगळा थरार रंगला.मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआधीही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हत्या, अत्याचार आणि फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. बलात्कार प्रकरणात गोवल्याचा राग मॉरिसला होता. त्यातूनच अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *