काही दिवसांपूर्वी पेण तालुक्यातील वडखळ पोलिस स्टेशन हद्दीत एका १२ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगीक अत्याचार झाल्याची ताजी घटना असतांना दादर सागरी पोलिस ठाणे हद्दीत १२ वर्षीय मुलगी झोपली असतांना तीच्या अंगाला हात लावून लज्जा उत्पन्न होईल असे घृणास्पद कृत्य केले. याबाबत 35 वर्षीय आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून संपूर्ण परिसरासह पेण तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सदर पीडित मुलगी ही आपल्या नातेवाईकांसोबत लग्न कार्यासाठी आली असता फिर्यादी महिला यांची मुलगी वय 12 वर्षे 06 महीने ही घराचे बेडरूम मध्ये झोपली असता तसेच पिडीत मुलगी हि अल्पवयीन आहे हे आरोपी यास माहीत असताना देखील तिच्या एकट्यापणाचा फायदा घेत आरोपीने पिडीत मुलीच्या (गुप्तांग) येथे हात लावुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे घृणास्पद कृत्य केले व अश्लील चाळे करीत राहिला. सदर घटना ही घरातल्यांच्या लक्षात आल्याने पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
सदर घटने बाबत दादर सागरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 80/2024 भा.दं.वि.क.354, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पॉस्को) अधिनियम, 2012 चे कलम, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दादर सागरी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई गुरुनाथ विशे हे अधिक तपास करीत आहेत.