वणीतील श्री विघ्नहर्ता मित्र मंडळाला सुमित काते यांची स्वखर्चातून भव्य सभामंडपाची भेट; ग्रामस्थांकडून ‘लोकप्रतिनिधी असावा तर असा’ची कौतुकाची थाप

नागोठणे | महेंद्र माने
रोहा तालुक्यातील वणी येथील श्री विघ्नहर्ता मित्र मंडळाची अनेक वर्षे असलेली सभा मंडपाची अडचण लक्षात घेऊन जि. प. सदस्य सुमित काते यांनी स्वखर्चातून उभारलेल्या भव्य सभा मंडपाचे लोकार्पण गुरुवार 17 सटेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी गावांचा विकास करणे ही माझी सामाजिक बांधिलकी असून स्वखर्चाने बांधलेल्या सभामंडपातून मला समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन सुमित काते यांनी केले.
यावेळी लोकप्रतिनिधी असावा तर असा अशी कौतुकाची थाप वणी ग्रामस्थांकडून सुमित काते यांना मिळाली. लोकार्पण वेळी पं. स. सदस्या अरुणा हंबीर, वणी माजी सरपंच जयेश जाधव,शिवसेना (शिंदे गट) नागोठणे विभाग संघटक दिनेश घाग, ऐनघर माजी सरपंच सचिन भोसले, नागोठणे शहराध्यक्ष प्रकाश मोरे तसेच पचक्रोशीसह वणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
वणी येथील श्री विघ्नहर्ता मित्र मंडळाची अनेक वर्षाची सभा मंडपाची अडचण दूर करत सुमित काते यांनी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून गावात एक भव्य व सुसज्ज सभा मंडप उभारला आहे. या सभामंडपाचा भव्य लोकार्पण गुरुवार 17 सप्टेंबर रोजी झाल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सुमित काते यांनी सांगीतले की, या गावाने मला भरभरून प्रेम व मोठी ताकद दिल्याने केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता गावाचा विकास करणे ही माझी सामाजिक बांधिलकी असून ते माझे कर्तव्य आहे. त्यामुळेच मी हा सभा मंडप बांधला अससल्याने या सभा मंडपामुळे गावातील सर्व लोकांना एकत्र येण्याचे व्यासपीठ मिळाले असून येथे सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी सोय होणार असल्याचे सांगून सभा मंडप बांधून दिल्याचे मला मनापासून आनंद व समाधान होत असल्याचे शेवटी काते यांनी सांगितले.
वणी ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप- लोकार्पण प्रसंगी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येथील महिलांनी भगिनींनी सुमित काते व मान्यवरांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. तसेच या सभा असून पूर्वी सभा तसेच सण उत्सवाच्या वेळी गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता. हीच अडचण सुमित काते यांनी ओळखून कोणत्याही सरकारी निधीची वाट न पाहता स्वखर्चाने प्रशस्त असा सभामंडप उभारण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेला.त्या मंडपाचे लोकार्पण झाल्याने मंडपामुळे मंडळाची अनेक वर्षाची प्रतीक्षा संपून सामाजिक, धार्मिक आणि शासकीय कार्यक्रमासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. या अनोख्या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी यांनी सुमित काते यांचे मनापासून आभार व्यक्त करीत असा लोकप्रतिनिधी मिळणे हे आमचे भाग्य असल्याचे सांगून लोकप्रतिनिधी असावा तर असा अशी कौतुकाची थाप देत आपल्या भावना व्यक्त केल्या..