निजामपूर रस्त्यावर एसटी बस घसरली; प्रवासी नसल्यानं मोठा अनर्थ टळला

महाड -दापोली मार्गावर अपघाताचं सत्र सुरूच ! एसटी बसला अपघात  
माणगांव | नरेश पाटील
रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास जोरदार झालेल्या पावसादरम्यान माणगांव आगारातून मुंबईच्या दिशेने निजामपूर–पाली मार्गे जाणारी एसटी बस निजामपूरजवळ रस्त्यावरून घसरून बाजूच्या ओल्या मातीत अडकली. या घटनेची माहिती समोर येताच परिसरात काही काळ चिंता निर्माण झाली.
मात्र, घटनेच्या वेळी एसटी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता, अशी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने विशेष माहिती दिली. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने जेसीबीच्या मदतीने चिखलात अडकलेली बस बाहेर काढून पुन्हा रस्त्यावर आणण्यात आली. त्यानंतर बस सुरक्षितपणे मार्गस्थ झाली.
दरम्यान, सध्या गणेशोत्सवानंतर गणेशभक्तांचा मोठ्या प्रमाणावर परतीचा प्रवास सुरू असतानाही, या किरकोळ घटनेनंतर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि निजामपूर–पाली मार्गावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली नाही. बस हटविल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहिली.