खालापूर तालुक्यातील आसरे येथे घरगुती वादातून लक्ष्मण डुकरे (वय ५५) यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रोहिणी पाटील हिला पोलिसांनी अटक केली असून, आणखी एक आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती आहे. फरार आरोपीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपींच्या घरगुती वादात लक्ष्मण डुकरे हे भांडण सोडविण्यासाठी गेले होते. याच वेळी झालेल्या वादातून त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत डुकरे यांचा मृत्यू झाला. मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेप्रकरणी अद्याप गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप रायअण्णा हे विभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुलक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांच्याकडूनही घटनेचा तपास सुरू असून, फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.