स्वप्नील सीताराम चोरगे यांच्या संकल्पनेतून कामथे–गोवेले विभागामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचविणे तसेच नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी युवासेना शाखेची स्थापना करण्यात आली. शिवसेना युवासेना कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्याहस्ते शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विकासशेठ गोगावले यांनी मनोगतात, या शाखेच्या माध्यमातून जनतेची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू. गोरगरीब जनतेसाठी पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि आणि त्यांच्या वतीने विकासशेठ गोगावले हे आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशी ग्वाही दिली.
जनसेवेसह लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ.निलेश कुंभार, तालुका प्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, नगरसेवक सिद्धेश शेठ, युवासेना तालुका प्रमुख विक्रम भिलारे, माजी सभापती शैलेश सलागरे, निलेश कंक, विकास नलावडे , दीपक दशरथ उतेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.