रोहा तालुक्यातील वरसे गावात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पुन्हा महीला सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे तर घडलेल्या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करत ग्रामस्थ महिलांनी आक्रमक भूमिका घेत आरोपीला फाशी द्या अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.
या प्रकरणी तेजस पडवळ (वय 25) आणि त्याचे दोन सहकारी आरोपी असल्याचे आरोप आहेत. अनुप पडवळ याचाही यात समावेश असून, यापूर्वी देखील चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे असल्याचे बोलले जात आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत कारवाई करत तिघांविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास युद्ध पातळीवर सुरू आहे.
स्थानिक नागरिकांचा आक्रोश :स्थानिक गावकऱ्यांनी पोलिस ठाण्याबाहेर जमून संताप व्यक्त केला असून, या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) करून आरोपींना कठोर शिक्षा, तसेच फाशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे रोहा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
अत्याचार प्रकरणी ७४,७५ ( एक ) ११५ (२) ३५२, ३५१(२) , १२७, (२) ३ (५) बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२ अन्वये रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावीत आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ नागरिकांकडून केली जात असून घडलेल्या घटनेबाबत रोहा पोलिसांकडून आरोपींविरोधात अधिक तपास युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकरणाला गांभीर्याने घेत पोलीस प्रशासन आरोपींना लवकरात लवकर न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती दिली आहे.