ROHA : ट्रांसफार्मर मधील कॉईलची चोरी, खांब साईनगर तीन दिवसापासून अंधारात

Mseb
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यात खांब साई नगर येथील चालू विद्युत उपकरण ट्रांसफार्मर मधील तांब्याच्या तारेची कॉइलच चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गेली तीन दिवस साई नगर गाव हे अंधारात असल्याचे समजते तर घटनेबाबत ग्रामस्थांचा एकच संताप उफाळून निघाला असून खंडित झालेला विद्युत पुरवठा सूरू करण्यास सबंधित खात्याकडून टाळाटाळ होत असून अद्याप ग्रामस्थांना अंधराशी सामना करावा लागतो हे दुर्दैव आहे.
सोमवारी ६ जानेवारी रोजी पहाटे सकाळी एक ते पाच च्या सुमरास ही घटना घडली असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार आहे तरी कसा, याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल ग्रामस्त वर्गातून व्यक्त केला जात आहे. तर चालू विद्युत उपकरण ट्रान्सफर्मावरील वीज पुरवठा खंडित करून अज्ञात चोरट्यांनी डीपिवरील तांब्याची कॉईल लंपास केल्याची घटना घडली असून येथील ग्रामस्थ गेली तीन दिवस अंधारात असून त्यांना अद्याप वीज पुरवठा सुरू करण्यास संबंधित अधिकारी वर्ग तसेच विद्युत वितरण खाते दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.
या घटनेची माहिती कोलाड विभागीय विद्युत वितरण खात्याचे कनिष्ठ अधिकारी सुरेश सोननीस यांनी कोलाड पोलिसांना दिली.तर घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस निरिक्षक नितिन मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनस्थळी भेट देत घटनेची पाहणी केली.
 याबाबत कोलाड पोलिस प्रशासन यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार mtpl/msedcl/100/22/378 कोड क्र 4135452 या क्रमांकाचे विदयुत रोहीत्र कोणतरी अज्ञात इसमांनी नटबोल्ट खोलून पोलवरुन खाली पाडून त्या मध्ये असणारे ऑइल सांडवून नुकसान करून रोहीत्रातील वरील वर्णनाची व किमतीची तांब्याची कॉइल फिर्यादीचे संमतीशीवाय स्थतःचे आर्थिक फायदया करीता चोरून नेली असल्याची घटना सोमवारी पहाटे एक ते पाच च्या सुमारास घडली असून यात तब्बल २६,००० रुपये किंमतीचे विद्युत रोहीत्रातील असूनव अंदाजे ४५ किलोग्रम वजनाचे तांब्याची कॉईल असल्याचे सांगीतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *