रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा – डिसेंबरपासून कालव्याला पाणी सोडा, अन्यथा आंदोलन

रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा – डिसेंबरपासून कालव्याला पाणी सोडा, अन्यथा आंदोलन
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील कालव्याचे पाणी गेली अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्याने खांब देवकान्हे विभागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पाणी सोडण्याची मागणी निवेदन कोलाड पाटबंधारे विभागाला बुधवारी १ ऑक्टोबर रोजी देण्यात आले.
रोहा तालुक्यातील डोळवहाळ बंधारे कुंडलिका सिंचनाखाली उजवातीर बहुचर्चित कालव्याला यावर्षी डिसेंबर हंगामापासून सुरळीत पाणी सोडण्यात यावे, गेल्या वर्षी मे अखेर कालव्याला पाणी टंचाई म्हणून पाणी सोडले होते.दुरुस्तीची कामे गेट पूर्ण न झाल्याने पाणी वेळेत सोडता आले नाही, मात्र तद्नंतर हे काम पूर्ण करण्यात आले आहे. तरी विभागीय शेतकरी, ग्रामस्थांनी समजून घेतले. तसे आता अजिबात खपवून घेणार नाही असा गंभीर ईशारा बुधवारी खांब देवकान्हे विभागातील तळवली तर्फे अष्टमी, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे येथील शेतकऱ्यांनी दिला.तर कोणतीही सबब न देता डिसेंबर हंगामापासून कालव्याला पाणी सोडण्यात यावे तसेच त्या आधी त्याचे गाळ काढण्यात यावे असे निवेदन कोलाड पाटबंधारे प्रशासनाला दिला आहे. 
कालव्याच्या पाण्यासाठी आता तालुक्यातील उजवातीर डावातीर कालव्याच्या ओलिताखाली शेती करणारे शेतकरी एकटवत धामणसई, धाटाव, निवी, पाठोपाठ तळवली देवकान्हे विभागातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी मुबलक पाणी सोडण्यासाठी विभागाला निवेदन दिले.तर दरम्यान, या कालव्याची कामे दुरुस्ती झाली आहे तसेच साफसफाई वेळेत वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली जातील, पूर्वीसारख्या हंगामी नियमाद्वारे पाणी सोडले जाईल तसेच त्याआधी पाहणी सर्वेक्षण केले जाईल पाहणी असे स्पष्ट आश्वासन कार्यकारी सहाय्यक अभियंता श्वेता चिचुलकर यांनी निवेदन प्रसंगी दिले. तर कालवा काठी वास्तव्य करत असलेल्या ग्रामस्थानी कालव्यात कचरा टाकून घाणीचे साम्राज्य करू नये ते स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करा त्याचे पाणी दूषित करू नये असे सूचित केले.
कार्य. अभियंता मिलिंद पवार,उप कार्य. अभियंता अतुल आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कार्य.अभियंता श्वेता चिचुलकर, प्रथम लिपिक भूषण ठाकूर यांना देण्यात आले.विभागीय शेतकरी रामचंद्र बामणे, मारुती खांडेकर,धनाजी लोखंडे,राम महाडिक, किशोर भोईर,रमेश महाडिक,धोंडू कचरे, पांडुरंग गोसावी, संदीप महाडिक,राम लोखंडे, रघुनाथ कोस्तेकर, दयाराम मरवडे, सुभाष बामणे, डॉ.श्यामभाऊ लोखंडे,यावेळी सह विभागातील शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते.
 दुरुस्ती कामे, साफसफाई वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन विभागाने करावे तसेच उन्हाळी हंगामातील भात पिक घेण्यासाठी पाणी वेळेत सोडले जाईल यावर भर देणे. कालव्याचे पाणी सोडण्याबाबत हयगय करू नये प्रशासनाची दिरंगाई बिलकुल खपवून घेतली जाणार नाही. पावसाळी पिकांचं भरोसा राहिलेले नाही. धानाचे पिकांचे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पीक हक्काचा आणि शेतकऱ्यांच्या हातातील नजरेतील पिक आहे. या हक्काच्या पाण्यासाठी खांब विभागीय शेतकऱ्यांची धाव कालव्याला पाणी सोडा, यासाठी प्रशासनाला दिले निवेदन दिले असून येत्या डिसेंबर आधी उजवातीर कालव्याला पाणी सोडा असे निवेदन दिले असल्याचे मारुती खांडेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *