मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घरे मिळावी यासाठी४६ वर्षे शासन दरबारी उपेक्षित असलेल्या गिरणी कामगारांनी १० मार्च रोजी मुंबईत विधानभवनावर. मोर्चा आयोजित करणार असल्याचे रायगड जिल्ह्यातील गिरणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी प्रकाश चिले यांनी महाडमध्ये गिरणी कामगारांच्या पदाधिकाऱ्यांची व संघटनांची आयोजित केलेल्या मीटिंग नंतर शासनाला निवेदन देण्यासाठी महाड शहरात काढलेल्या कामगारांच्या रॅली दरम्यान बोलताना स्पष्ट केले.
गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे आत्तापर्यंत कोणीही लक्ष दिलेल नाही आणि तो गप्प आहे पूर्ण विखुरलेला आहे आता ४६ वर्षे म्हणजे एक तप संपून गेलेला आहे त्याच्यामध्ये आणि अनेक वेळा संघटनाने मागणी करून त्यावेळेला सुरुवातीला दीड लाखाच्या वरती गिरणी कामगार आहेत कारण एक पंधरा-वीस हजार फक्त घर मिळाली सुरुवातीच्या काळात आणि त्याच्यानंतर आज पर्यंत कोणी तिकडे लक्ष दिलेल्या नाही.
आता प्रत्येक मराठी माणूस मुंबईचा असेल कारण मुंबई मराठी माणसाचीच आहे त्याच्या करता १०५ हुतात्मे झालेले सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये गिरणी कामगारांचा समावेश होता आणि आज गिरणी कामगार पूर्ण बाहेर गेलेला आहे त्याला कोण वाली राहिलेला नाही या शासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे आता कुठेतरी आशादायी चित्र निर्माण होते असं वाटतंय आणि १० मार्चला विधानभवनावर मोर्चा निघणार आहे आणि त्याच्यामध्ये १७ संघटना म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून जशी आपली महाड, माणगाव, पोलादपूर आणि मंडणगडची संघटना आहे त्याच पद्धतीने पूर्ण राज्यभरातून सतरा संघटना १० मार्च विधानभवनावर धडकणार आहेत आणि विधानभवनावर शेवटचा मोर्चा असेल की तो शांतपणे आमचा हक्काची लढाई लढण्यासाठी आणि त्याच्यात जर आम्हाला ते प्राप्ती मिळाली नाही किंवा शासनाने विचार केला नाही तर एक मे कामगार दिनाच्या दिवशी “आर या पार “तिथं बिलकुल कुठल्याही प्रकारची माघार घेतली जाणार नाही आणि शासनाला याची दखल घ्यावीच लागेल कारण गिरणी कामगार आम्हाला मध्ये देऊ केला की सेलू वांगणी या ठिकाणी म्हणजे पूर्ण मुंबईच्या बाहेर गिरणी कामगारांना तिकडं घर अशी अंट टाकली होती की शेलु वागणीचं घर जर तुम्ही नाकारला तर तुम्हाला तुमच्या यादीतून तुमचा नाव कपात होईल आणि तुम्हाला घर मिळणार नाही तुम्ही पात्र राहणार नाही पण शासनाच्या आभार मानतो की शासनाने तिची अट होती ती ३१ जानेवारीला जीआर काढून ३१ डिसेंबरला जीआर काढून ती रद्द केली आणि एक आम्हाला दिलासा मिळालेला आहे.
आता कुठेतरी असं वाटतंय की गिरणी कामगारांना घर मिळेल गिरणी कामगार विखुरला गेला आहे प्रत्येक गावात दोन-चार प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात विखुरला गेला आहे आणि आम्ही एकत्र करून ही लढाई येतो सुरू करत आहोत आज मराठी भाषा गौरव दिन आहे सर्वांना त्याच्या शुभेच्छा आणि त्या दिवसाचा अवचित्य साधून आजही वेळी कामगार संघटनेचे घर मिळण्यासाठी या महाड सारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूमीतून आम्ही सुरुवात करत आहोत आणि लोकांनी त्याला आम्हाला पाठिंबा द्यावा सर्व क्षेत्रातून पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही विनंती करायला शासनाने याची दखल घ्यावी शासनाने आवाहन करत असल्याचे गिरणी कामगार प्रतिनिधी प्रकाश चिले यांनी सांगितले.