पेण निवडणुकीत वादाचा धुरळा ! उमेदवाराचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल, काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे

Pen photo shoot viral
PEN न्यूज ऑनलाइन टीम |
पेण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस शिगेला पोहोचली असून उमेदवारांनी प्रचाराची गती वाढवली आहे. मतदारांची मने जिंकण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जात असताना शहरातील राजकीय वातावरण तंग झाले आहे. आतापर्यंत ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित जागांसाठी स्पर्धा अधिक चुरशीची झाली आहे.
दरम्यान, प्रचारा दरम्यान मतदारांकडे फिरत असलेल्या एका उमेदवाराचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याची चर्चा सुरू असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “महिलांचा सन्मानही करू न शकणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे,” असे म्हणत त्यांनी संबंधित उमेदवाराच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Nanda mahtra 26
सत्ताधारी पक्ष महिलांना सन्मान देणारा पक्ष असल्याचा दावा करत असताना अशा वादग्रस्त उमेदवारावरच विसंबून मत मागणे हे पेणमधील मतदार विशेषतः महिलांनी गांभीर्याने विचारात घ्यावे, असे आवाहन नंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, २४ नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष अशी एकूण २५ जागांसाठी निवडणूक होत असताना या व्हिडिओ प्रकरणामुळे निवडणुकीचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *