जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा एकमेव चेहरा अजय सावंत

Ajay sawant
माथेरान | मुकुंद रांजणे 
निसर्ग जगायला शिकवितो आणि परिस्थिती सांभाळून घेते आणि हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यशस्वी जीवनाची ध्येयधोरणे आपल्या कवेत घेण्यासाठी उत्तुंग झेप घेऊन मजल दरमजल केवळ सुखाच्या शोधात न जाता भौगोलिक परिसीमा आणि त्यातील चढउतार यशस्वीपणे पादाक्रांत करून यशाची गुरुकिल्ली आपल्या ओंजळीत घेत अशक्य ते शक्य करण्यासाठी ज्यांचा प्रयत्न असतो तीच माणसे भविष्यात पुढे जाऊन एकप्रकारे इतिहास रचत असतात.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे माथेरान मधील माजी  नगराध्यक्ष आणि भावी नगराध्यक्ष अजय सावंत होय. राजकारणात यश अपयश येतच असते.काहीवेळा त्यांना त्यावेळेस पक्षातील घरभेदी असणाऱ्या स्वकीयांकडून पराभवाला देखील सामोरे जावे लागले होते. त्यातूनही मार्ग काढत खचून न जाता निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अजय सावंत यांनी उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष ही पदे भूषविलेली आहेत. तसेच माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचे सभापती पद यशस्वीपणे सांभाळत आहेत. सातत्याने या गावासाठी काहीतरी नवीन गोष्टी करण्याची चिकाटी आणि जिद्द त्यांना अंगीकृत आहे.वरीष्ठ अधिकारी वर्ग असो किंवा राजकीय क्षेत्रातील विविध पक्षांचे नेतेमंडळी असोत सर्वांशी जिव्हाळ्याचा संबंध आणि मैत्री त्यांनी आजतागायत कायम ठेवली आहे. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी श्रमिक हातरीक्षा संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले होते त्यावेळी अजय सावंत यांनी कुठलाही विचार न करता गावात वाहतूक व्यवस्था उत्तम प्रकारे सुरू होऊन पर्यटन क्रांती घडावी यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात ठराव मंजूर करून दिला होता. त्यामुळेच ई रिक्षा सुरू होण्यासाठी  गती मिळाली.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून माथेरानच्या विकास कामांसाठी जवळपास १२३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून घेतला होता.त्यानंतर हा निधी तत्कालीन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या कार्यकाळात सकारात्मक दृष्ट्या वापरात आणला गेला त्यामुळेच क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते, महत्त्वाचे काही पॉईंट्स विकसित करण्यात आले. घाटरस्ता दुरुस्ती करण्यात आली होती. तरुणांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा यासाठी व्हॅली क्रॉसिंग सारख्या साहसी खेळांचे उपक्रम पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू व्हावेत याबाबत त्यांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला होता.प्रत्येकाच्या सुखदुःखात जातीने हजर राहून अडीअडचणीच्या काळात मदतीचा हातभार लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. परंतु कुणालाही केलेल्या मदतीचा उहापोह कदापि केला नाही. एक दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सर्वांमध्ये मिसळणारा चेहरा अजय सावंत यांच्या रूपाने माथेरान करांना लाभला आहे.
वयोमान झालेले असले तरी सुद्धा एकप्रकारची ऊर्जा, आत्मबळ आणि सर्वसामान्य लोकांना अभिप्रेत असणारी कामे पूर्ण करण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. लोकनेता म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. असा हा जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा एकमेव चेहरा अर्थातच भावी नगराध्यक्ष अजय सावंत यांना माथेरान करांची सेवा करण्याची संधी चालून आली आहे. आगामी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांना मतदार राजा नगराध्यक्ष पदाची संधी देऊन त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पुरस्कृत शिवराष्ट्र पॅनेलच्या सर्वच कार्यक्षम उमेदवारांना नगरपरिषदेच्या सभागृहात गावाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी देतील यात शंकाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *