खांब -देवकान्हे विभागातील गौरी-गणपतींना भावपूर्ण निरोप!

कोलाड | श्याम लोखंडे
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला मोठ्या जयघोषात पाच दिवसांच्या बाप्पाला खांब देवकान्हे परिसरातील भक्तगणांनी भक्तीभावाने शनिवारी उशिरापर्यंत निरोप दिला. सोमवारी 14 सप्टेंबर रोजी देवबाप्पांचे मोठ्या उत्साही वातावरणात आगमन झाले सलग सात दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर खांब देवकान्हे विभागातील खांब,पुगाव, वैजेनाथ, घेरासुर,मुठवली, शिरवली,गोवे, शिरवली, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे,बाहे, देवकान्हे, येथील गणेश भक्त ग्रामस्थांनी मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी आपल्या लडक्या गणरायाला आणि त्यासोबत गौरींनाही सायंकाळी उशिरापर्यंत भावपूर्ण निरोप दिला. बाप्पांचे आगमन झाल्यापासून मात्र पावसाची विश्रांती मिळाल्याने गणेश भक्तांचा मोठा आनंद द्विगुणित झाले होते.
दीड दिवसानंतर पाच दिवसांचे गौरी गणपती बाप्पांचे विसर्जन हे सायंकाळपर्यंत ठीक ठिकाणी गणपती बाप्पांचे आणि गौरींचे विसर्जन मोठया उत्साही वातावरणात झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, ‘पुढच्या वर्षी लवकर या’उंदीर मामा की जय च्या जयघोष फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताश्याच्या गजरात परिसरातील येथील लहान थोर मंडळींनी गणेश मूर्तीचे व गौरींचे विसर्जन करण्यात आले.तर ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी आणि पावसाच्या उघडीप मध्ये बाप्पांचे विसर्जन करत भक्तीभावाने टाटा करत निरोप दिला.
येथील गाव नजिकच्या तलावात तसेच नदी पात्रात विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. गणपती विसर्जन सोहळ्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन दक्षता घेतली होती तसेच विसर्जन घाट मार्गाची स्वच्छ्ता देखिल गणपती आगमन आधीपासूनच करण्यात आली होती.
ढोल-ताशांच्या गजरात, टाळ- मृदुंगांच्या सुरात आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने आणि जड अंतः करणाने निरोप दिला. तर एका मागून एक गणपती मूर्ती गणेश भक्त डोक्यावर घेत विसर्जन स्थळी जात होते.गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करत थोडा वेळ पावसाची उघडदीप मिळताच विसर्जनस्थळी पोहचत पूजा आरत्यांचे तसेच लहान थोरांकडून पारंपरिक पद्धतीने नाच गाणे खालु बाजाच्या वाद्यात बाल्या नाच आणि गाण्यांचे गायन करत महिलांकडून गौरींचे गीत मंजूळ स्वरात गायन करत करत पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे व गौरींचे विसर्जन गणपती बाप्पांना टाटा करत व मनभावे जयघोष करत भक्तीभावाने निरोप दिला.