कर्जत तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाज संघटना संचालीत सह्याद्री आदिवासी ठाकूर-ठाकर समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य संस्था ठाणे यांच्या अंतर्गत काम करत असून आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत या संघटनेच्या पदाधिकारी यांचा कार्यकाल ४ जून २०२६ रोजी संपला होता. संघटनेची नविन कार्यकारणीची निवडीची मिटिंग आज रविवारी २६ जुलै रोजी रामाचीवाडी धानकोबा मंदिर येथे घेण्यात आली.यावेळी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवाच्या उपस्थितीत एकमतानी नविन कार्यकारणी निवडण्यात आली.
आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे नविन कार्यकारणी अध्यक्ष कांता भिका पादीर,उपाध्यक्ष अर्जून नागो केवारी,लक्ष्मण उघडा,सचिव नितीन निरगुडा,राकेश कवठे, खजिनदार भरत तुकाराम पादीर,दिनेश पिंगळा, महीला अध्यक्षा जयवंती दत्तात्रेय हिंदोळा,महीला उपाध्यक्षा निलम वसंत ढोले,प्रसिद्धी प्रमुख मोतीराम पादीर,नितीन पारधी, या सर्वांची आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत नविन कार्यकरणीत निवड करण्यात आली.
कर्जत तालुक्यात आदिवासी ठाकूर समाज संघटना संचालित सह्याद्री आदिवासी ठाकूर-ठाकर समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य संस्था ठाणे या संघटनेच्या अंतर्गत चालवत आहेत.कर्जत तालुक्यात आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जतची स्थापना १९८५ साली झाली असून तीच छोटस रोपट आता मोठे होत घेल आहे.आज संघटनेचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेतल जात असून हि संघटना सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत आहे.
हि संघटना आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे.आदिवासी ठाकूर समाज संघटना अनेक वर्षापासून तालुक्यात काम करत असून संघटनेची नविन कार्यकारणी तयार करून संघटनेचे मावळते अध्यक्ष परशुराम दरवडा, यांचे अध्यक्ष पद उगवते नविन अध्यक्ष कांता पादीर यांना देण्यात आले.त्यांचे स्वागत करून पुढील नविन सर्वांच पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.