पोलादपूर तालुक्यातील आकार प्रतिष्ठान कापडे बुद्रुक तर्फे साने गुरुजी माध्यमिक विद्यालय लोहारे येथे आयोजित करण्यात आलेल्या समूहगान स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा परिषदेची परसुले प्राथमिक शाळा आणि लोहारे येथील साने गुरूजी माध्यमिक शाळेचे गायन समूह अनुक्रमे प्राथमिक आणि माध्यमिक गटामध्ये विजेते ठरले आहेत. या स्पर्धेप्रसंगी 5 व 8 वी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचादेखील सन्मानसोहळा आकार प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपिठावर सहयोग प्रतिष्ठानचे सहयोगचे संस्थापक अध्यक्ष विनायक चित्रे, कार्याध्यक्ष रमेश चव्हाण, डॉ.अक्षय माळवदे, कोमसाप पोलादपूरचे माजी अध्यक्ष जयंत भा.देशपांडे, कापडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक हिंदूराव माळी, आकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सलागरे, उपाध्यक्ष रामदास सकपाळ, सचिव राजाराम शेलार, खजिनदार रविकांत सकपाळ, माजी मुख्याध्यापक अ.वि.जंगम, परिक्षक अनिल पवार, मोरे मॅडम, अविनाश जंगम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी इयत्ता 5 व 8 वी शिष्यवृत्तीप्राप्त आर्या सलागरे, संस्कार भोईर, सान्वी पवार, भार्गवी दिक्षित, स्नेहा शेलवणे, तनिषा मोरे, अनिकेत मांगले, वेदांत पवार, श्रावणी इंगवले आदी विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या समूहगायन स्पर्धेत प्राथमिक विभागाचे 7 समूह तर माध्यमिक विभागाचे 5 समूह सहभागी झाले. यामध्ये राजिप शाळा परसुले प्रथम क्रमांक 3 हजार रूपये व चषक, लोहारे राजिप शाळा द्वितीय क्रमांक 2 हजार रूपये व चषक आणि चिरेखिंड प्राथमिक शाळा तृतीय क्रमांक 1 हजार रूपये व चषक आणि माध्यमिक विभागामध्ये लोहारे साने गुरूजी माध्यमिक शाळा प्रथम क्रमांक 3 हजार रूपये व चषक, वरदायिनी माध्यमिक शाळा द्वितीय क्रमांक 2 हजार रूपये व चषक तर न्यू इंग्लिश स्कूल साखर तृतीय क्रमांक 1 हजार रूपये व चषकाचे मानकरी ठरले. व्यासपिठावरील आकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सलागरे व मान्यवरांच्याहस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी साखर न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सुभाष ढाणे यांच्या आगामी सेवाकाळपूर्तीबद्दल तसेच कापडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अ.वि.जंगम यांचा 75 वर्षपूर्तीबद्दल आकार प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष अजय सलागरे यांनी केले तर पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन अमर सलागरे यांनी केले.