कोलाड परिसरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

कोलाड | श्याम लोखंडे 

मुंबई -गोवा महामार्गांवरील कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोल नाका परिसरात गुरुवार दि. १२/११/२०२६ रोजी एक अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर या इसमाचे अंदाजे वय ६५ ते ७० वर्षे वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती कोलाड पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून त्याची ओळख पटवण्यासाठी कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि भारत फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस करीत असुन सदर या इसमाच्या छायाचित्रावरून कोणाला माहिती असल्यास तात्काळ कोलाड पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन कोलाड पोलीसांकडून करण्यात येत आहे.