पेण तालुक्यातील खरोशी फाटा येथे भीषण अपघात! टँकरच्या धडकेत स्कूटर चालकाचा मृत्यू; भाऊबीजेच्या दिवशी अलिबाग-चौलवर शोककळा

PEN न्यूज ऑनलाइन टीम |
पेण तालुक्यातील खरोशी फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर टँकर आणि स्कूटर यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अलिबाग तालुक्यातील चौल येथील लक्ष्मण भालचंद्र राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे चौल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दादर सागरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण भालचंद्र राणे हे आपल्या मेव्हण्यासह स्कूटर क्रमांक MH 43 BS 8979 वरून अलिबाग येथून वाशी, नवी मुंबईकडे जात होते. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील खरोशी फाटा येथे त्यांच्या स्कूटरची टँकर क्रमांक NL 01 AH 3653 सोबत धडक झाली. या अपघातात लक्ष्मण राणे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दादर सागरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे चौल परिसरात शोककळा पसरली आहे.