अध्यक्ष आसिफ दादन आणि CEO अकबर कोंडकरी यांच्या प्रयत्नांना यश; स्वतःचा Direct RTGS/NEFT कोड मिळाल्याने बँक परिवारात आनंदाचे वातावरण!

रायगड | अमुलकुमार जैन
कोकण बँकेच्या प्रगतीच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला स्वतःचा Direct RTGS/NEFT कोड मिळवण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. त्यामुळे कोकण बँकेच्या स्वावलंबी बँकिंग व्यवस्थेकडे वाटचालीला नवी दिशा मिळाली असून, बँक परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष आसिफ दादन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर कोंडकरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बँकेकडे स्वतःची थेट RTGS/NEFT सुविधा उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना तसेच ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः आर्थिक व्यवहार करताना निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे ग्राहकांच्या नाराजीला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बँकेने प्रयत्न सुरू ठेवले. अनेक वर्षांचा पाठपुरावा, तांत्रिक पूर्तता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर अखेर या लढ्याला यश मिळाले आहे.
या यशामागे अध्यक्ष आसिफ दादन यांची दूरदृष्टी, संपूर्ण संचालक मंडळाचे सहकार्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर कोंडकरी यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. बँकेच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याच्या दिशेने त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यामुळे यश मिळाले आहे.
विशेष म्हणजे, या प्रक्रियेत बँकेच्या IT विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. तांत्रिक कौशल्य, अथक मेहनत आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या जोरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले उद्दिष्ट साध्य झाले. त्यामुळे IT विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही विशेष कौतुक केले जात आहे.
स्वतःचा Direct RTGS/NEFT कोड उपलब्ध झाल्यामुळे बँकेला थेट RTGS आणि NEFT व्यवहार करण्याची सुविधा मिळाली आहे. यामुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक सुलभता आणि कार्यक्षमतेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. बँकेच्या कामकाजाला आधुनिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल अध्यक्ष आसिफ दादन, मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर कोंडकरी, संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी, IT विभाग आणि सर्व कर्मचारीवृंद यांचे अभिनंदन होत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेले हे यश केवळ एका सुविधेपुरते मर्यादित नसून, कोकण बँकेच्या सामूहिक प्रयत्नांचे आणि विकासाच्या दिशेने टाकलेल्या महत्त्वपूर्ण पावलाचे प्रतीक ठरले आहे.