Revenue Day: १ ते ७ ऑगस्टदरम्यान साजरा होणार ‘महसूल सप्ताह’

Revenue Day: १ ते ७ ऑगस्टदरम्यान साजरा होणार'महसूल सप्ताह'
रायगड : 
राज्यभरात महसूल विभागाच्या वतीने १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह’ राबवण्यात येणार आहे. याबाबत माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सप्ताहात प्रत्येक दिवशी विविध जनहिताचे उपक्रम राबवले जाणार आहेत.
महसूल सप्ताह २०२५चे महत्त्वाचे उपक्रम:
📅 १ ऑगस्ट – महसूल दिन
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि निवृत्त महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार. विविध प्रमाणपत्रांचे वाटप.
📅 २ ऑगस्ट – अतिक्रमण नियमितीकरण
३१ डिसेंबर २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र नागरिकांना घरपट्ट्यांचे वाटप.
📅 ३ ऑगस्ट – शेत रस्ते वाद निवारण
‘पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत वादग्रस्त रस्त्यांचे निराकरण. प्रत्येक शेताला १२ फुटांचा क्रमांकित रस्ता.
📅 ४ ऑगस्ट – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान
महसूल मंडळस्तरीय शिबिरे. ओळखपत्र, जात, उत्पन्न व अधिवास प्रमाणपत्रांचे वाटप.
📅 ५ ऑगस्ट – DBT अडचणी निराकरण
तलाठी घरोघरी जाऊन आधार कार्ड बँकेशी लिंक करणार. थेट लाभ हस्तांतरणास मदत.
📅 ६ ऑगस्ट – शर्तभंग प्रकरणे व कारवाई
शासकीय जमिनीवरील शर्तभंग वा अतिक्रमण आढळल्यास त्या परत घेण्याची कारवाई.
📅 ७ ऑगस्ट – M-Sand धोरण आणि सांगता समारंभ
कृत्रिम वाळू धोरणासंबंधी कार्यशाळा. महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ व उल्लेखनीय कामगिरीची दखल.
उद्दिष्ट:
राज्यभरातील महसूल यंत्रणेला अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख बनविणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *