Govt Jobs : धर्मादाय आयुक्त कार्यालयात विविध पदांची भरती; जाणून घ्या अंतिम मुदत

Govt Jobs : धर्मादाय आयुक्त कार्यालयात विविध पदांची भरती; जाणून घ्या अंतिम मुदत
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयात गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क पदांकरिता एकूण १७९ पदांची सरळ सेवा भरती जाहीर झाली आहे. जाहिरात क्र. ०१/२०२५ अन्वये निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक कनिष्ठ/उच्च श्रेणी, विधी सहाय्यक अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३ ऑक्टोबर २०२५ आहे.
  • गट-क पदे : निरीक्षक (१२१ पदे, वेतन श्रेणी ₹35,400–₹1,12,400), वरिष्ठ लिपिक (३१ पदे, ₹25,500–₹81,100).
  • गट-ब (अराजपत्रित) पदे : लघुलेखक कनिष्ठ श्रेणी (२२ पदे, ₹41,800–₹1,32,300), लघुलेखक उच्च श्रेणी (२ पदे, ₹44,900–₹1,42,400), विधी सहाय्यक (३ पदे, ₹41,800–₹1,32,300).
  • अर्हता : पदानुसार पदवी/१० वी उत्तीर्ण व शासकीय टंकलेखन किंवा लघुलेखन प्रमाणपत्र, तसेच आवश्यक अनुभव.
  • वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय ४३ वर्षे, दिव्यांग ४५ वर्षे, पदवीधर अंशकालीन गट-क ५५ वर्षे).
  • निवड पद्धत : ऑनलाइन परीक्षा; मौखिक परीक्षा नाही. किमान ४५% गुण आवश्यक.
  • फी : खुला प्रवर्ग ₹1,000/-; मागास/अनाथ ₹100/-; मा.स. व दिव्यांग उमेदवारांना फी माफ.
  • ऑनलाइन अर्ज संकेतस्थळ : https://charity.maharashtra.gov.in (अंतिम तारीख ३ ऑक्टोबर २०२५).
  • माहितीसाठी हेल्पलाईन : ०२२-२४९७६४२२ / cocheadoffice@gmail.com.
उन्हाळी सुट्टीत MS-CIT करण्यासाठी पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल कम्प्युटर एक उत्तम पर्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *