भाकरवड येथे भारताचा 80 वा स्वतंत्रदिन सोहळा भाकरवड गावचे अध्यक्ष श्री शंकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शिक्षण तज्ञ श्री अरुण राऊत शाळा समितीच्या अध्यक्ष प्रियांका पाटील, उपाध्यक्ष विकास पाटील, मीनाक्षी पाटील , माजी ग्रामपंचायत सद्दश्य प्रकाश पाटील ,अँड भक्ती पाटील, निवृत पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील, पोलिस पाटील संजय पाटील, रायगड भूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार श्री जीवन पाटील,सागर पाटील, विघ्नेश पाटील, कवी श्री मोहन पाटील, श्री बाळाराम पाटील, श्री रमेश पाटील , श्री राजेंद्र पाटील, चिंतामण पाटील, श्री नरेंद्र पाटील , श्री उदय पाटील, श्री विशाल पाटील , अक्षय पाटील, अभिलाष पाटील , किरण पाटील, मंगेश म्हात्रे , देवेंद्र पाटील, शेखर पाटील, विशाल पाटील, मिलिंद पाटील , गणेश गावंड, रवींद्र द .पाटील, रामकृष्ण म्हात्रे, रविंद्र कृ .पाटील , संदीप पाटील, प्रवीण पाटील, सोपान पाटील, गावातील तरुण मित्रमंडळी ग्रामस्थ ,भगिनी आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विध्यार्थी ग्रामस्थ यांनी भाकरवड गावात जाऊन भारताच्या 80 वा स्वतंत्र दिना निमित्ताने प्रभातफेरी काडून जनजागृती केली वंदे मातरम, भारत माता की जय, चला भारत गीते गाऊ घरोघरी तिरंगा पाहू , जय जवान जय किसान , जनशक्ती चा हा प्राण तिरंगा अमुचा महान ,आशा घोषणा देत सारा परिसर दुम दुमुन सोडला होता .यानंतर तिरंगा झेंडाचे जतन, निपुण भारत , पर्यावरण संवर्धन आशा प्रतिज्ञा घेण्यात आल्या शाळेतील संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून ध्वजगीत, ध्वजप्रतिज्ञा व देशभक्तीपर गीत सादर केले.
यावेळी विद्यार्थी मित्रांनी भाषणे सादर केली उत्कृष्ट अभिनय सादर करून उपस्थित सर्वांचे मने जिंकली या उपस्थित सर्व मान्यवरांचचे सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना पाटील व जितेंद्र पाटील, अंगणवाडी सेविका वैशाली पाटील, मदतनीस समिता पाटील आदींनी केले श्री गिरीश जुईकर दरवर्षी प्रमाणे विद्यार्थीना प्रोत्साहन मिळण्यासाठी बक्षिसे देण्यात आली तर गावातील दानशूर व्यक्तींनी गोळ्या, बिस्किटे आदी देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका वैशाली पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रंजना पाटील यांनी मानले