सेवा संकल्पपूर्ती अभियानातून सर्वसामान्यांना न्याय व दिलासा; खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक

चौक | अर्जुन कदम
सेवा संकल्प पूर्ती अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय,दिलासा मिळत असून त्याचे दैनंदिन जीवनातील गरजेचे काम पूर्ण होत हे संकल्पपूर्ती अभियान  राबविणारी सर्व शासकीय  यंत्रणा तहसीलदार अभय चव्हाण यांचे कौतुक होणे गरजेचे आहे,असे उद्गार उप सभापती भाई शिंदे यांनी काढले खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी खालापूर प्रशासकीय कार्यालयात सेवा संकल्पपूर्ती अभियान राबविले आहे,त्याप्रसंगी लाभार्थी यांना विविध लाभाचे वाटप कार्यक्रमात उप सभापती भाई शिंदे बोलत होते.
यावेळी सभापती कृष्णा पारंगे, तहसीलदार अभय चव्हाण,गटविकास अधिकारी संदीप कराड,वसिष्ठ पोलीस प्रदीप रायअण्णा,अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर,गटशिक्षण अधिकारी राजवर्धन,निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड,महिला व बालविकास अधिकारी विशाल गोताड,उपकार्यकारी अभियंता कुरुंगळे,भूमि अभिलेख अधीक्षक केंद्रे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.आपल्या प्रास्ताविक भाषणात तहसीलदार अभय चव्हाण यांनी सेवापूर्ती अभियानाची माहिती दिली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील आणि जनसेवेच्या २५ वर्षांच्या पूर्तीनिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवले जात आहे.खालापूर तालुक्यात देखील सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. ७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हे अभियान आयोजित केले आहे. समाजसेवा, राष्ट्रनिर्माण, आरोग्य सेवांचा विस्तार आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना याची माहिती देणे हा प्रमुख उपक्रम व उद्देश आहे. या सेवापूर्ती अभियानाच्या माध्यमातून आरोग्य व स्वच्छता कार्यक्रम ग्रामीण व शहरी भागात आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि स्वच्छता अभियानांचे आयोजन खालापूर तालुक्यात करण्यात आले. शालेय शिक्षण विभागामार्फत “विकसित भारत २०४७” चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, तसेच करिअर कौन्सिलिंग आणि डिजिटल साक्षरता मार्गदर्शन सत्रे शिक्षण विभाग यांच्याकडून घेतले आहे.
यावेळी महिला व बालकल्याण खाते अंतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला. पोषण योजनांची माहिती देवून अंगणवाडी उत्सव’ उत्सव साजरा करण्यात आला. राज्यसरकारच्या अंतर्गत तीस योजनांची माहिती व लाभ देण्यात आला.अमोल वाघ,मंडळ अधिकारी भरत सावंत,माणिक सानप,संदेश पानसरे,श्रीनिवास खेडेकर,सचिन वाघ,नितीन महाडिक,आरती तेलखडे,माधव कावरके,उदय देशमुख,सर्व विभागातील अधिकारी,कर्मचारी,लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मरागजे क्रिडा शिक्षक यांनी केले.