लोकनेते अशोक दादा साबळे स्मृती प्रतिष्ठानची नवी कार्यकारीणी जाहीर

Ravindra Kuveskar
माणगांव ( रविंद्र कुवेसकर ) : लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान, माणगांव संस्थापक ॲड. राजीव साबळे यांच्या मार्गदर्शनात सोमवार दि.१५ जानेवारी रोजी सायंकाळी ०६.०० वाजता झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रतिष्ठानच्या नविन कार्यकारीणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे, माणगांव मधिल सुप्रसिध्द उद्योजक अरुण क्षीरसागर यांची अध्यक्ष तर नितीन दसवते यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती तसेच विरेश येरुणकर-उपाध्यक्ष, प्रसाद धारिया-उपाध्यक्ष, राजेंद्र सुर्वे-सचिव, रविंद्र कुवेसकर-सह सचिव, सागर पाटील-खजिनदार, अविनाश पाटील-सहखजिनदार, सिद्धेश पिंगळे-कार्यकारणी सदस्य
तसेच प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष समाधान उतेकर, स्वतः संस्थापक ॲड.राजीव साबळे, नगराध्यक्ष तथा प्रतिष्ठान सदस्य ज्ञानदेव पवार, उद्योजक नितीन (बाळूशेट) बामगुडे यांची प्रतिष्ठानच्या मुख्य सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्तांचे माणगांव मधुन अभिनंदन होत आहे.
तसेच या सभेत प्रतिष्ठानच्या महिलांची देखील नविन कार्यकारणी-२०२४ जाहीर करण्यात आली. सौ.शर्मिला सुर्वे यांची महिला संघटक तर सौ.सुवर्णा जाधव-अध्यक्षा, सौ.स्मिता बोंबले-कार्याध्यक्षा, सौ.करुणा गायकवाड-उपकार्याध्यक्षा, संगीता उतेकर-उपाध्यक्षा, सौ.नंदिनी जाधव-उपाध्यक्षा, सौ.स्वाती जाधव-उपाध्यक्षा, सौ.निलांबरी गायकवाड-सचिव, सौ.वैष्णवी गोडबोले-सहसचिव, सौ.निलम भोसले-खजिनदार, सौ.स्नेहा ओसवाल-सहखजिनदार , सौ.अंजली पवार-सल्लागार, सौ.स्नेहा दसवते-सल्लागार, सौ.ज्योती सोनावणे-कार्यकारणी सदस्य यांची नव्याने नियुक्ती झाली.
या प्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष अरुण क्षीरसागर व कार्याध्यक्ष नितीन दसवते व महिला कार्यकारिणीचे ॲड.राजीव साबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच प्रतिष्ठानची स्थापना झाल्यापासुन जिल्हा व तालुकास्तरीय समाजोपयोगी सांस्कृतिक, लोककला, क्रिडा, मनोरंजन, गुणगौरवपर व सेवाभावी अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे झाल्याचे ॲड.राजीव साबळे यांनी सांगत, रायगड सांस्कृतिक कला मंडळ, महाराष्ट्र, संयोजक डाॅ.अजय मोरे यांच्या माणगांवात दि.२६ जाने. रोजी होणाऱ्या “महाराष्ट्राची हास्य जत्रा” कार्यक्रमास देखील प्रतिष्ठानच्या वतिने सहकार्य करण्याचे सर्व सदस्यांना आवाहन केले.
गतवर्षातील अध्यक्ष समाधान उतेकर यांचे नेतृत्वात प्रतिष्ठानने बैलगाडा शर्यत, नाचाचे सामने, जत्रोत्सव ठिकाणी पाणपोई सेवा, माणगांव महोत्सव सारख्या भरगच्च कार्यक्रमांचे नेटके आयोजन केले. तसेच या सभेत मागील इतिवृत्ताचा आढावा घेत या पुढेही चांगले कार्यक्रम आयोजीत करण्याची सर्व सदस्यांनी चर्चा केली. तसेच या वर्षीही नाविण्यपूर्ण कार्यक्रम करण्याचा निर्धार करुन यंदा जिल्हास्तरीय भव्यदिव्य कब्बडी स्पर्धेची आखणी नियोजनपर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *