रोहा अष्टमी शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी व्यापक जनजागृती रॅली

Roha plastic raly
कोलाड | श्याम लोखंडे 
रोहा नगर परिषदेतर्फे शहर प्लास्टिक व थर्माकोलमुक्त करण्याच्या उद्देशाने व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे व नगरसेवकांनी रोहा अष्टमीतील दुकानदारांना गुलाब पुष्प देत “प्लास्टिक पिशव्या देऊ नका” अशी विनंती केली. यावेळी पर्यावरण संरक्षण व शहर स्वच्छतेचा संदेश देत रॅली काढण्यात आली.
अभियानादरम्यान नाटिकांद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. एकल वापराच्या सिंगल यूज प्लास्टिकचा त्वरित वापर बंद करावा, तसेच खरेदीसाठी शासनमान्य जाडीच्या पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिक, व्यापारी संघटना, दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी सांगितले.
या रॅलीत मुख्याधिकारी अजय एडके, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुरुवातीला दंडात्मक कारवाई टाळून जनजागृतीवर भर देण्यात येत असून नागरिक व दुकानदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *