रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल संपूर्ण जिल्ह्यात वाजला असून रोहा तालुक्यात सर्व राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी शेवटच्या दिवसांपर्यंत करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ आजचा शेवटचा दिवस तर काही तसाच बाकी आहेत, ज्यामुळे राजकीय हालचालींना अधिक मोठा वेग आला आहे. ही निवडणूक तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नव्या नेतृत्वासाठी महत्त्वाची ठरत असून राज्यात अनेक उलथापालथ आणि राजकीय समीकरण मधल्या काळात बदलली आहेत.त्यामुळे येथील साऱ्याच पक्षांना रायगडच्या राजधानीवर आमच्या पक्षाचा झेंडा फडकला जावा यासाठी उमेदवारांकडून अशा पल्लवित होत आहेत.
तर निवडणूक कार्यक्रमउमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून, 21 जानेवारीपर्यंत असून आजचा शेवटचा दिवस आणि काही तास अर्ज दाखल करण्यासाठी उरले असल्याने आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत तर तालुक्यात जिल्हा परिषद गट चार आणि पंचायत समिती गण आठ त्यामुळे या जागांसाठी किती उमेदवार उमेदवारी अर्ज भरतात याकडे लक्ष आहे तसेच या अर्जांची छाननी तद्नंतर किती वैध आणि किती अवैध हे छाननी नंतर स्पष्ट होईल नंतर यातील किती किती उमेदवार आपले उपदेवारी अर्ज मागे घेतील मगच खरी रंगत आणि कसरत या निवडणुकीत उमेदारांची असणार असून मतदान 5 फेब्रुवारीला होईल आणि मतमोजणी 7 फेब्रुवारीला अपेक्षित आहे.त्यामुळे राष्ट्रवादी,शेकाप,शिवसेना शिंदे गट, भाजप, शिवसेना उबाठा असे सारेच पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात असून काही उमेदवारांनी पक्ष श्रेष्टींचा आदेश घेत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर आज शेवटचा दिवस उरला असून आज अखेरच्या दिवशी उर्वरित उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समित्यांच्या 118 जागांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे.राजकीय हालचालीसर्व पक्षांत उमेदवार निवडण्यासाठी जोरदार चर्चा सुरू आहेत, विशेषतः रोहा हा राजकारणात मोठा केंद्र बिंदू समजला जात असल्याने मतदारसंघात शिंदे गट,उबाठा शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी, शेकाप ,भाजप, शरद पवार राष्ट्रवादी गट, काँग्रेस असे पक्ष आहेत त्यामुळे देशात एनडीए राज्यात महायुती, त्याच बरोबर महा विकास आघाडी असे असलेले पक्षाचे कार्यकर्ते कोणत्या भूमिकेत आहेत तसेच कोणाची युती कोणाशी हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याने आपले वर्चस्व कायम टिकून ठेवण्यासाठी एकत्र येतील का याकडे लक्ष लागेल आहे.
सोमवार ते बुधवार (19 ते 21 जानेवारी) दरम्यान अर्जांचा मोठा ओघ अपेक्षित दिसून येत असून, आज शेवटचा दिवस उरला असून पोलिस बंदोबस्त देखील अधिक असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणी केली जात आहे का ? त्यामुळे उमेदवारी अर्ज एकूण किती उमेदवार भरतात ते आज स्पष्ट होईल परंतु इच्छुकांची तयारी जोरदार सुरू आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव आणि नेत्यांच्या निर्णयांमुळे उशीर होत आहे, तरी आजच्या शेवटच्या दिवसातील पुढील काही तास हे निर्णायक ठरतील.