महाडमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल

Mahad nomination
महाड | मिलिंद माने 
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी व पंचायत समितीच्या १०. गणांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आज मंगळवारी जिल्हा परिषद गटासाठी ४ उमेदवारी अर्ज तर पंचायत समिती गणासाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
शिवसेना शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन करत मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महाड तालुक्यातील बिरवाडी, खरवली ,नाडगाव तर्फे बिरवाडी, दासगाव ,व. करंजाडी या पाच जिल्हा परिषद गटासाठी तर पंचायत समितीच्या धामणे, बिरवाडी ,वरंध, खरवली, नडगाव तर्फे बिरवाडी ,नाते, दासगाव, अप्पर तुडील , करंजाडी, व विन्हेरे या १० पंचायत समिती गणासाठी निवडणुका होत आहेत. नामनिर्देशन पत्र देण्याची कालावधी १६ जानेवारी ते २१ जानेवारी अशी आहे. गेली चार दिवस कोणत्याही पक्षांनी एकही नामनिर्देशन पत्र . दाखल केले नव्हते आज शिवसेने शिंदे गटाकडून वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करत प्रांत कार्यालय मध्ये उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.
महाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीमार्फत निघालेल्या शिवसैनिकांच्या ताफ्यासह मंत्री भरत मारुती गोगावले यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमा भरत गोगावले तालुकाप्रमुख रवींद्र उर्फ बंधू तरडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते.खालुबाजाच्या वाद्यावर व भगवी उपरणे घालून तालुक्यातील शिवसैनिकांनी व जिल्हा परिषद गटासाठी व पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवारांनी देखील या रॅली मध्ये सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली रॅली प्रांताधिकारी कार्यालयासमोर येऊन त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपापले उमेदवारांचे नामांकन पत्र दाखल केले.
आज भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जां मध्ये जिल्हा परिषद गटासाठी ४ उमेदवारी अर्ज भरण्यात आले तर पंचायत समिती गणासाठी १४ उमेदवारी अर्ज भरण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी बिरवाडी विभागातून १,खरवली विभागातून १, नडगाव तर्फे बिरवाडी विभागातून १ आणि करंजाडी विभागातून १ असे एकूण ४ उमेदवारी अर्ज भरण्यात आले मात्र दासगाव विभागातून कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे पंचायत समिती गटासाठी धामणे -२, बिरवाडी -३, वरंध -३, खरवली-२, नड गाव तर्फे बिरवाडी -२,नाते -१,अप्पडतुडी -१ असे एकूण १४ पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गणामध्ये देखील दासगाव विभागातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *