कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या निवडणूकीसाठी शिवसेना शिंदे गट, शेकाप, भाजपा, आजाद समाज पाटी, राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट व शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवारांचे कर्जत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे.
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद गट प्रभाग क्र.०९ कळंब अनुसुचित जमाती, प्रभाग क्र.१० कशेळे अनुसुचित महिला, प्रभाग क्र. ११ माणगांव तर्फे वरेडी सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. १२ नेरळ सर्वसाधारण महिला, कर्जत प्रभाग क्र.१३ कडाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्र.१४ मोठे वेणगांव अनुसुचित जमाती माहिला या एकूण सहा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण १७ पोशीर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, १८ कळंब अनुसूचित जमाती महिला राखीव, १९ पाथरज -अनुसूचित जमाती महिला राखीव, २० कशेळे – अनुसूचित जमाती, २१ माणगाव तर्फे वरेडी सर्वसाधारण, २२ उकरूळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, २३ नेरळ – सर्वसाधारण, २४ दामत – सर्वसाधारण, २५ वाकस – सर्वसाधारण, २६ कडाव – सर्वसाधारण महिला राखीव, २७ मोठे वेणगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग, व २८ बीड बुद्रुक सर्वसाधारण महिला या बारा जागांकरीता आज दि. २० जानेवारी २०२५ रोजी कर्जत निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडे आज नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना व शेकाप युतीचे जिल्हा परिषद गटाचे व पंचायत समिती गणाचे उमेदवारांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशन अर्ज हे दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद गटापैकी राष्ट्रवादी अजित पवार मोठेवेणगान उषा अंकुश ठोंबरे, कशेळे वर्षा सुरेश दोरे, कळंब नारायण राजाराम डांमसे, शिवसेना उबाठा नेरळ सुनिता रोहीदास मोरे, माणगाव तर्फे वरेडी सुर्वणा प्रदीप ठाकरे, शिनसेना शिंदे नेरळ सुनिता सुरेश टोकरे, कडाव योगेश पुंडलिक कांबरे, माणगाव तर्फे वरेडी रेशमा योगेश मिसाळ, कळंब हरिचंद्र धर्मा निरगुडा, कशेळे प्रमिला भरत शिद, भाजपा माणगाव तर्फे वरेडी राधिका किशोर ठाकरे, कडाव मिनेश भगवान मसणे, काँग्रेस आय माणगाव तर्फे वरेडी सिता शाम ठेंबे, अपक्ष माणगाव तर्फे वरेडी राधिका किशोर ठाकरे, नेरळ सुनिता रोहीदास मोरे असे एकूण १५ तर पंचायत समिती गणाच्या जागांकरीता राष्ट्रवादी अजित पवार बीड बुद्रुक नमिता सुधाकर घारे, दामत महेश लक्ष्मण रवारीक, पोशीर वर्षाला दशरथ वेहेले, कशेळे अक्षय राम तिटकारे , शिवसेना उबाठा मोठे वेणगाव चित्रा जगदीश ठाकरे, शिवसेना शिंदे वाकस अमोल दशरथ जाधव, माणगाव तर्फे वरेडी महेश सुरेश विरले, कशेळे सचिन बाळकृष्ण भुईर, भाजपा नेरळ प्रज्ञेश प्रसन्न खेडकर, दामत नरेश सुरेश मसणे, मोठे वेणगाव सुनिल दत्तात्रय आंग्रे, वाकस विठ्ठल बाबू भागित, शेकाप पाथरज अश्विनी कांता पादीर, व अपक्ष माणगाव तर्फे वरेडी विजय दिलीप गायकवाड, दामत अक्षय सखाराम हिसालगे, नेरळ प्रज्ञेश प्रसन्न खेडकर, दामत नरेश सुरेश मसणे, मोठे वेणगाव सुनिल दत्तात्रय आंग्रे असे एकूण १८ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.