नागोठण्यात 23 वर्षीय पुजाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या !

Alibag : कनकेश्वर फाटा येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या !
नागोठणे | महेंद्र माने
 जैन मंदिराचे पुजारी मयूरकुमार महेशभाई राठवा, वय 23 वर्षे मूळ राहणार वालपरी,पोस्ट माकणी,तालुका बोरडिली – छोटा उदयपूर, गुजरात सध्या राहणार जैन मंदिर समोर, आराधना भवन पहिला मजला याने मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास आराधना भवनच्या तिसऱ्या मजल्यावरील तीन नंबरच्या खोलीत पंख्याला बेडशीटच्या साईड पट्टीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिस तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन मंदिराचा कायमस्वरूपी पुजारी हा महिनाभरासाठी सुट्टीवर गेला असल्याने मयूरकुमार राठवा याला सदर ठिकाणी बदली पुजारी ठेवण्यात आला होता. तो आराधना भवन येथील पहिला मजल्यावर राहात होता. मयूरकुमार हा मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी दुपारच्या 3:45 वाजण्याच्या सुमारास आराधना भवनाच्या तिसरा मजल्यारील खोली नंबर तीन मध्ये गेला व त्याने पंख्याला बेडशीटच्या साईड पट्टीच्या सहाय्याने कोणत्यातरी अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला नागोठणे प्राथमिक केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
या घटनेची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक 26/2025 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 प्रमाणे नोंद झाली असून पुढील तपास सहा.पो.नि.सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश रुईकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *