नागोठणे जिल्हा परिषदेत सुमित काते यांचा दणदणीत विजय; पंचायत समितीत कोळी व हंबीर विजयी

नागोठणे |  महेंद्र माने 
रायगड जिल्हा परिषद व रोहा पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूक मतदान शनिवार 07 फेब्रुवारी रोजी पार पडली. अटी तटीच्या झालेल्या सदरील निवडणुकीत 39 नागोठणे जिल्हा परिषद मतदार संघात परिवर्तन विकास आघाडी शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार सुमित काते हे 5146 मताने विजयी झाले. तसेच पंचायत समिती 77 नागोठणे गणातून राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपा युती राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार समृद्धी कोळी या 441 मताने विजयी झाले. तर 78 सुकेळी गणातून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार अरुणा हंबीर या 296 मताने विजयी झाले आहेत.
या पंचवार्षिक निवडणूकीत नागोठणे जिल्हा परिषद 39 गटामध्ये एकुण साधारण 28972 मतदारांपैकी 21447 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये युतीचे किशोर ओटरमल जैन यांना 7983 मते मिळाली,आघाडीचे सुमित दत्तात्रेय काते यांना 13129 मते मिळाली, तर मनसेचे साईनाथ दिगंबर धुळे यांना 226 मते मिळाली तसेच नोटाला 191 मते मिळाल्याने आघाडीचे सुमित काते यांचा 5146 मताने विजय झाला.
तसेच पंचायत समिती 77 नागोठणे गणात एकुण साधारण 14398 मतदारांपैकी 10309 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये युती राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवार समृद्धी संतोष कोळी यांना 5267 मते मिळाली,आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या अंजली हिराजी दुर्गावले यांना 4826 मते मिळाली तसेच नोटाला 259 मते मिळाल्याने (राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपा युतीचे समृद्धी संतोष कोळी या 441 मताने विजयी झाले. तर 78 सुकेळी गणात एकुण साधारण 14574 मतदारांपैकी 11138 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये युतीच्या भाजपा उमेदवार योगिता विलास शिद यांना 5252 मते मिळाली,परिवर्तन विकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवार अरुणा जानु हंबीर यांना 5548 मते मिळाली , शेकाप उमेदवार गुलाब धर्मा वाघमारे यांना 283 मते मिळाली तसेच नोटाला 193 मते मिळाल्याने परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार अरुणा जानू हंबीर या 296 मताने विजयी झाले.
सर्व विजयी उमेदवारांचे नागोठणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याची आताषबाजी करीत स्वागत करण्यात आले असून त्यांचे नागोठणे गटातून अभिनंदन होत आहे.