ग्रामपंचायत उपसरपंच अकलाक पानसरे यांनी आपला अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ज्ञानेश्वर साळुंखे यांची मंगळवार 12 मे रोजी बाळासाहेब ठाकरे ग्राम सचिवालयातील शैलेन्द्र देशपांडे सभागृहात झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील ग्रामपंचायतची 05 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत जनसेवा आघाडीची निर्विवात सत्ता स्थापन झाली. त्यानंतर थेट जनतेतून पहिल्या महिला सरपंचपदी सुप्रिया महाडीक यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अकलाक पानसरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिल्यानंतर मंगळवार 12 मे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलाम 30-अ प्रमाणे सरपंच सुप्रिया महाडीक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उपसरपंच निवडणूक प्रक्रियेत ज्ञानेश्वर साळुंखे व अॅड. प्रकाश कांबळे यांनी आपला अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये प्रकाश कांबळे यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर सचिवालयातील कै.शैलेंद्र देशपांडे सभागृहात माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ.मिलिंद धात्रक, उपसरपंच अकलाक पानसरे,ग्रा.पं. सदस्य – ज्ञानेश्वर साळुंखे,प्रकाश कांबळे,संतोष नागोठणेकर, ग्रा.पं.सदस्या- सुप्रिया काकडे, शबाना मुल्ला,अमृता महाडीक,पूनम काळे ईप्ते, शहनाज अधिकारी, विनीता पाटील,जन्नत कुरेशी,ज्योति राऊत, सुलताना लंबाते, भाविका गिजे,ग्राम अधिकारी राकेश तेमघरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या विशेष सभेत ज्ञानेश्वर साळुंखे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदासाठी ज्ञानेश्वर साळुंखे यांची निवड झाल्याचे सरपंच तथा निवडणूक अधिकारी सुप्रिया महाडीक यांनी जाहीर केले.
ज्ञानेश्वर साळुंखे यांची निवड होताच फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली. उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर साळुंखे यांच्यावर शहर व विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यांची होती उपस्थितीत – उपसरपंचपदी ज्ञानेश्वर साळुंखे यांची निवड जाहीर झाली. त्यावेळी संजय महाडिक,सुनिल लाड,भरत गीजे,अजित दळवी,बंटी मांडे, संजय काकडे,रुपेश पोटे,बबली खंडागळे,अल्विन नाकटी,रुपेश नागोठणेकर, नितीन पत्की, सत्यजित रावकर,पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र थळकर,पो.हवालदार महेश लांगी,स्वप्नील भालेराव,विक्रम फडतरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.