दिघी पोर्टवर अत्याधुनिक RoRo टर्मिनल – भारताच्या वाहन निर्यातीला नवे इंजिन

Dighi adani port
रायगड | अमुलकुमार जैन
दिघी पोर्ट आता देशातील प्रमुख ऑटोमोबाईल एक्स्पोर्ट हब बनण्याच्या दिशेने मोठी झेप घेत आहे. मदरसनच्या SAMRX संयुक्त उपक्रम आणि अदानी समूहाच्या दिघी पोर्ट लिमिटेड यांच्यात झालेल्या करारामुळे मुंबई–पुणे–नाशिक–औरंगाबाद औद्योगिक वाहन बेल्टमधील कंपन्यांसाठी अत्याधुनिक, वेगवान आणि सुरक्षित निर्यात सुविधा उपलब्ध होणार आहेत. अदानी पोर्ट्स अँड SEZ चे CEO अश्वनी गुप्ता यांनी या भागीदारीमुळे भारतातील ऑटो लॉजिस्टिक्सचे स्वरूप आमूलाग्र बदलणार असल्याचे नमूद केले.
दिघी पोर्टवरील रोरो सुविधेमध्ये सिंगल-विंडो यार्ड व्यवस्थापन, PDI, चार्जिंग, स्टोरेज आणि कार्गो लोडिंगची संपूर्ण एकात्मिक व्यवस्था तयार करण्यात आली आहे. AI आधारित यार्ड ऑप्टिमायमुळे झेशनवाहनांची थांबण्याची वेळ जवळपास शून्यावर येणार आहे, तर 1.3 किमी लांबीच्या रोरो रेडी जेट्टीमुळे वर्षभर हवामानाचा अडथळा न येता ऑपरेशन्स होऊ शकतील. EV-रेडी लॉजिस्टिक्स हबसह OEM-इंटिग्रेटेड डॅशबोर्ड्समुळे लाईव्ह ट्रॅकिंग आणि लोड प्लॅनिंग अधिक कार्यक्षम होणार आहे.
या विकासामुळे दिघी पोर्ट पश्चिम भारताचा सर्वात स्पर्धात्मक लॉजिस्टिक गेटवे ठरणार असून रायगड जिल्ह्याच्या औद्योगिक वाढीस नवी दिशा मिळणार आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ऑटोमोबाईल निर्यातीला बळ मिळणार असून रोजगार, गुंतवणूक आणि वाहतूक क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. दिघी पोर्ट आता केवळ बंदर न राहता, देशाच्या वाहन निर्यातीचा भविष्यातील ‘सुपरहायवे’ ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *