रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील मौजे चिल्हे येथील लक्ष्मीबाई धोंडू लोखंडे यांचे 80 व्या वर्षी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून लोखंडे परिवारावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे.
साऱ्या लोखंडे परिवारासह गावातील लहान थोरांची मोठी आई ही मोठी त्यांची ओळख साऱ्यांच्या हृदयात आईच स्थान प्रेमळ वृत्ती,शांत स्वभाव,मनाचा मोठेपण मनमिळाऊ,गोर गरीब जनसामान्यांना मदतीसाठी सदैव हात पुढे महिला सामाजिक कार्यात सदैव पुढे धार्मिक तथा आध्यात्मिक विचार श्रवण कार्याची मोठी आवड. पती धोंडू लोखंडे यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा हाकला साऱ्या संसाराची जबाबदारी घेत शेती व्यवसाय करण्याची मोठी आवड जिद्द चिकाटी शेती व्यवसायात प्रगत संसाराचा गाडा हाकताना सारे कुटुंब सक्षम करण्यात यशस्वी झाल्या अशा या महान लक्ष्मी बाई लोखंडे यांच्या निधनामुळे महिला वर्गात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, जावा,पुतणे,पुतणी, सुना, नातवंडे पतवंडे असा मोठा लोखंडे परिवार आहे.तर त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत विधीसाठी विविध समाजातील सामाजिक,शैक्षणिक, कला, क्रीडा,राजकीय क्षेत्रातील असंख्ये मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांचे पुढील दशक्रिया विधी मंगळवारी ९ जून तर उत्तरकार्य तेरावे शुक्रवारी १२ जून रोजी त्यांच्या निवासस्थानी मौजे चिल्हे येथे आध्यात्मिक चिंतनातून श्रद्धांजलीपर पुष्पांजली अर्पण करून संपन्न होणार आहेत.