कुणबी समाजोन्नती वसंघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा यांच्या वतीने रोहा तालुक्यात कुणबी समाजाची जनगणना प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुक्यातील विविध भागात ग्रुपनिहाय बैठकींचे आयोजन संघाच्या तसेच तालुका कुणबी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील मेंढा, नागोठणे, खांब आणि कोलाड या विभागीय ग्रुपमध्ये आयोजित बैठकींना येथील कुणबी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बैठकींना कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर,ओबीसी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर, कुणबी समाज रायगड जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष शिवराम महाबळे, रोहा तालुका अध्यक्ष रामचंद्र सकपाळ, रोहा पंचायत समितीचे उपसभापती संजय माडळुकर, तालुका उपाध्यक्ष अनंता थिटे, तालुका खजिनदार सुहास खरीवले, उद्योजक प्रमोद म्हसकर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा युवक संघटनेचे सदस्य मंगेश सानपसह आदी कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
सदरच्या आयोजित पदाधिकारी आणि गृहनिहाय विभागीय कुणबी समाज बैठकीत यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जनगणनेसाठी वितरित करण्यात आलेले फॉर्म समाजबांधवांनी अचूक माहिती भरून लवकरात लवकर तालुका शाखेकडे जमा करावेत, असे आवाहन केले. जनगणनेच्या माध्यमातून समाजाची अचूक लोकसंख्या तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलित होणार असून भविष्यात विविध विकासात्मक योजना राबविताना त्याचा महत्त्वपूर्ण उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान शंकरराव म्हसकर, सुरेश मगर आणि रामचंद्र सकपाळ यांनी चारही ग्रुपमधील अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जनगणनेचे महत्त्व विशद करून मार्गदर्शन केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही जनगणना अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी निवास खरीवले, रघुनाथ करंजे, दिलीप आवाज, हिराजी शिंदे, मारुती खांडेकर, रामचंद्र चितळकर, संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते. जनगणना मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असून त्यासाठी कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत असून समाजाची अचूक लोकसंख्या व सामाजिक-आर्थिक माहिती संकलित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या जनगणना मोहिमेत सर्व समाजबांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.