घरफोडी करणारे चोरटे मुद्देमालासह जेरबंद !

Neral Police
कर्जत ( गणेश पवार ) : दि. १० जानेवारी २०२४ रोजी नेरळ खांडा येथे राहणारे महेंद्र हरिशंकर दुबे यांच्या बंद घराचे लॉक हे चोरटयांनी तोडून घरातील सोने चांदीचे दागिने व पैसे असा एकूण ३,२७,३६५ रूपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती. नेरळ पोलीसांनी सदर घरफोडीच्या तपासाची चक्र लागलीच फिरवत अवघ्या सहा तासात दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असुन, त्यांच्या कडून चोरीचा ऐवज  हस्तगत केला. या कामगिरीचे सर्व स्तरातून नेरळ पोलीसांचे कौतुक होत आहे.
दि.१० जानेवारी २०२४ रोजी रात्री १०.०० ते दि.११ जानेवारी २०२४ रोजीचे ८.०० वाजण्याचे सुमारास नेरळ रवांडा येथील राहणार महेंद्र हरिशंकर दुबे यांच्या बंद घराचे लॉक हे अज्ञात चोरटयांनी तोडून घरातील ३,२५,३५० रूपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व २,०१५ / – रूपयांची चिल्लर असा एकूण ३,२७, ३६५ रुपयांचा ऐवज हा चोरून नेल्याची घटना घडली होती.
सदर घटने संदर्भात दि. १२ जानेवारी २०२४ रोजी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या वरून गु.र.नं. ०५/२०२४ भादंविसं कलम ४५४, ४५७, ३८०, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्यानुसार सदरचा गुन्ह्याची उकळ करण्याकामी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि शिवाजी ढवळे यांनी तपास पथकाचे पालीस उपनिरिक्षक नितीन मंडलिक, पोलीस उपनिरिक्षक लिंगप्पा सरगर, सहा. फौजदार श्रीरंग किसवे, पोलीस हवलदार नवनाथ म्हात्रे, यांना मार्गदर्शन केले असता, सदर घरफोडी संदर्भात पथकाकडून चौकशी सुरू केली असता, फिर्यादी महेंद्र दुबे यांच्या घरा शेजारी राहणार अविनाश रामसिंग राठोड, वय वर्ष २४, राहणार नेरळ खांडा यांच्या संशयीत हालचालीनुसार त्यास चौकशी कामी पोलीस ठाण्यात नेवून त्याची कसुन चौकशी केली असता, त्याच्या सोबत त्याचा साथीदार अयाउद्दीन निजामुद्दीन शेख, वय वर्ष २१, राहणार अमन कॉम्पलेक्स, नेरळ, खांडा ,ता. कर्जत, जि. रायगड यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने अवघ्या सहा तासात त्यांना या घरफोडी प्रकरणी ताब्यात घेवून त्यांच्या कडून चोरीला गेलेला सोने चांदीचे दागिने व चिल्लर असा एकूण ३,२७,३६५/ – रूपयांचा एवेज हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगोर कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे,पालीस उपनिरिक्षक नितीन मंडलिक, पोलीस उपनिरिक्षक लिंगप्पा सरगर, सहा. फौजदार श्रीरंग किसवे, पोलीस हवलदार नवनाथ म्हात्रे यांनी महत्वाची कामगिरी केली असुन, त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *