पेण आणि सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 19 फेब्रुवारी) रात्री आणि पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळाले. रात्री 10 वाजून 10 मिनिटे, 10.15, 10.30 आणि 10.45 वाजता सलग चार वेळा तसेच पहाटे दोन ते तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. पेण तालुक्यातील वरवणे, सायमाळ, तिलोरे, झापडी, दिवाणमाळ, तिलोरे, भेंड्याचीवाडी, सिंधळाचीवाडी तसेच सुधागड तालुक्यातील भोपेचीवाडी, देऊळवाडी, महागाव, कवेळीवाडी
पोलीस व प्रशासनाची तातडीने भेट गावकऱ्यांनी पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांच्याशी संपर्क साधताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. रात्रीच्या धक्क्यांमुळे घरांच्या खिडक्या, काचा हादरल्याने अनेक लोक घराबाहेर पडले होते.
प्रशासनाचा पाहणी दौरा; कोणतीही हानी नाही गुरुवारी सकाळी तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी भूकंपग्रस्त भागाची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.