उरण तालुक्यातील सारडे गावात महादूबाई महादेव माळी (वय ७७) या शेकरी महिलेचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. लाईट गेलेली असताना घराबाहेर पडलेल्या महादूबाईंना सर्पदंश झाला, मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.
महादूबाई घरात एकट्याच असताना सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी विज गेल्यामुळे त्यांनी टॉर्च घेतला नव्हता. काहीतरी चावल्यासारखं वाटल्यावर सुरुवातीला विंचू चावला असावा, असं समजून घेतलं. मात्र काही वेळात त्यांच्या तब्येतीत बिघाड झाला. कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना उरण रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
सर्पमित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा सर्पदंश अत्यंत विषारी सापाचा होता. पावसाळ्याच्या सुरुवातीस अशा घटनांमध्ये वाढ होत असते कारण सापांच्या बिळांत पाणी जाऊ लागल्याने साप मानवी वस्तीत भक्ष्याच्या शोधात येतात.