लग्नाचे आमिष दाखवून पोलादपूरच्या लॉजवर करंजखोलच्या विद्यार्थिनीवर इच्छेविरुद्ध संबंध; गर्भवती असतानाही जबरदस्ती, आरोपीला नाशिकमधून अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुरुड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शारीरिक अत्याचार
पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील मोहितबाग लॉजवर महाड तालुक्यातील करंजखोल गावातील एका विद्यार्थिनीला आणून तिच्या इच्छेविरूध्द संबंध ठेवल्याप्रकरणी पोलादपूर पोलीसांनी आरोपीला नाशिक येथून अटक करून महाड न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील करंजखोल येथील एका तरूण विद्यार्थिनीला दि.21 डिसेंबर 2024 पासून दि.14 फेब्रुवारी 2026 दरम्यान लग्नाचे अमिष दाखवून तिच्या इच्छेविरुध्द पोलादपुर येथील मोहीतबाग लॉज तसेच महाड येथील हॉटेल आंगण लॉज व ठाणे तसेच नाशिक येथील लॉजवर वेळोवेळी नेवून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यातुन पिडीत तरूणी गरोदर राहिली असतानादेखील तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध केले.
याप्रकरणी पिडीत तरूणीने स्वत: तरूणाविरूध्द दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर पोलीस ठाण्यात येऊन हे.कॉ.सुतार यांच्याकडे फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपी प्रसाद जिभाऊ नाडेकर, वय 23 वर्षे, राहणार राहू हॉटेलसमोर, संत सावरकर नगर, पेठ रोड, नाशिक याला पोलादपूर पोलीसांनी तातडीने नाशिक येथे जाऊन अटक केली आणि त्याच्याविरूध्द गुन्हा र.जि. नंबर 06-2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश आर. मुंढे यांनी नाशिक येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याला महाड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.