गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेसिंह भोसले यांनी रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत पाहणी केली तर आयोजित पाहणी दौऱ्यात मंत्री शिवेंद्रराजेसिंह भोसले यांनी कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुल आणि येथील मार्गाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील होते.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे पाहणी करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाका येथे दुपारी ३.२० च्या सुमारास आंबेवाडी नाका येथे भेट देत आंबेवाडी नाका येथील उड्डाणपूलचे काम चालू आहे. या कामाची त्यांनी पाहणी करत खर्च वाढला तरी आंबेवाडी नाक्यावरील काम करण्यात येईल. यावेळी त्यांनी सांगितले की, जनतेच्या सुविधा नुसार हे काम करण्यात येईल. प्रसंगी यावेळी त्यांनी स्थानिक रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेतले यावेळी माजी आ.अनिकेत तटकरे यांनी काम करत असताना उद्भवणार्या समस्या सांगितल्या. चांगले काम व्हावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
दरम्यानच्या उड्डाणपूल, सर्विस रोड, गटारे, पावसाळ्यात तुंबणारे पाणी आदी विषयात चर्चा करण्यात आली. यावेळी आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, श्रीकांत चव्हाण, कुमार लोखंडे, भावेश शेठ जैन, महेशस्वामी जंगम, आदी रहिवासी तसेच नागरिक कार्यकर्ते उपस्थित व ग्रामस्थ उपस्थित होते.