मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सलग १८ वर्ष. अपघातांची मालिका चालू असताना या अपघातग्रस्तांना वेळोवेळी महामार्गावरील सुरक्षा पथकातील पोलिसांसहित स्थानिक ग्रामस्थ वेळोवेळी मोलाचे सहकार्य करतात अशा रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते पोलादपूर भागापर्यंतच्या जखमी व मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना मदत करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा सत्कार महामार्ग सुरक्षा पथकातील पोलिसांनी केला.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर. तब्बल१८. वर्षे अपघातांची मालिका ही चालूच आहे मात्र या अपघातातील जखमींना व मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना वेळोवेळी वाहनातून बाहेर काढणे व रुग्णालयापर्यंत नेण्याचे काम व वाहतुकीचा कोळंबा होऊ नये यासाठी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम पोलिसांसहित स्थानिक ग्रामस्थ हे वेळोवेळी करतात अशा ग्रामस्थांना या कामात सहकार्य केल्याबद्दल महाड येथील महामार्ग सुरक्षा पथकाच्या रायगड परिक्षेत्राने आज मृत्युंजय दूत म्हणून महामार्ग सुरक्षा पथकाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पुष्पलता दिघे (चव्हाण) व महामार्ग सुरक्षा पथकाचे महाड येथील उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे यांनी महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथील पोलीस चौकीमध्ये जाहीर सत्कार केला.
यावेळी इंदापूर ते पोलादपूर कशेडी घाटापर्यंतच्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाता मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या प्रवाशांना मदत करण्याचे काम करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा सत्कार यावेळी करण्यात आला व तसेच त्यांचे त्यावेळी अनुभव व महामार्ग पोलिसांकडून अपघातग्रस्तांना मदतीसाठी करावयाच्या उपायोजनेदरम्यान लागणारे उपलब्ध किट वाटप करण्यात आले.