माणगांवच्या मोर्बा रोड चौकात १०×६० फुटांचा महाकाय फ्लेक्स ठरतोय लक्षवेधी

माणगांवच्या मोर्बा रोड चौकात १०×६० फुटांचा महाकाय फ्लेक्स ठरतोय लक्षवेधी

माणगांव | नरेश पाटील 
माणगांव शहरातील वर्दळीच्या मोर्बा रोड चौकात उभारण्यात आलेल्या तब्बल १०×६० फुटांच्या एकसंध फ्लेक्स बॅनरची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. माणगावच्या इतिहासात एवढ्या मोठ्या आकाराचा एकाच तुकड्यातील फ्लेक्स प्रथमच पाहायला मिळाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात असून, मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचेही या बॅनरकडे लक्ष वेधले जात आहे.
शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी उभारण्यात आलेल्या या महाकाय फ्लेक्समुळे मोर्बा रोड चौकाचे दृश्यच बदलून गेले आहे. यापूर्वी या ठिकाणी साधारण १०×२० फुटांचे मोठे फ्लेक्स लावले जात होते; मात्र तब्बल १०×६० फुटांचा सलग आणि एकसंध फ्लेक्स प्रथमच उभारण्यात आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
हा फ्लेक्स भाजप युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या पुढाकाराने लावण्यात आला आहे. भाजपमध्ये नव्याने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी हा फ्लेक्स उभारण्यात आल्याचे थोरे यांनी सांगितले. दरम्यान, या महाकाय फ्लेक्सच्या माध्यमातून माणगांव परिसरातील भाजपची संघटनात्मक ताकद आणि वाढती कार्यकर्त्यांची उपस्थिती दाखविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.