महाड MIDC मध्ये एम्बायो कंपनीत भिषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

महाड | मिलिंद माने 
महाड औद्योगिक वसाहती मधील एम्बायो या कंपनीत. गुरुवारी सायंकाळी भिषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आग तात्काळ आटोक्यात आल्याने मात्र जीवित हानी झाली नाही . मात्र या निमित्ताने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
महाड औद्योगिक वसाहती मध्ये एम्बॉय ही बल्कड्रग फार्मा कंपनी कार्यरत आहे गुरुवारी दुपारी या कंपनीच्या इम्फयूयंर या विभागात मेंटनन्स काम सुरु होते यामध्ये वेल्डींगच्या सहाय्याने नटबोल्ट तोडण्याच काम सुरु असता सांयकाळी ६ .४५ वाजता वेल्डींगच्या आगीचा ड्राफ खाली पडून खाली सांडलेल्या केमिकलने अचानक पेट घेतल्याने भीषण आग लागली.
या आगीच्या धुराचे प्रचंड लोट व ज्वाला मुळे महाड औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये एकच घबराटीच वातावरण पसरल होत मात्र कंपनीतील फायर सिस्टम तात्काळ अॅक्टीव होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या आगीच्या घटनेची माहिती समजताच औद्योगिक वसाहत आणि महाड नगर पालिकेचे असे एकुण चार अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल होत आग तात्काळ आटोक्यात आणण्यात यश आले आहे. या आगी मध्ये सुदीप देबनाथ शंतनु हा कामगार जखमी झाला आहे अशी माहिती कंपनीचे उत्पादन मॅनेजर सुभाष काटे यांनी दिली आहे या भिषणआगी मध्ये कोणतीही जिवीन आणि झाली नसली तरी या कंपनीतील औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न मात्र पुन्हा एकदा उभा राहिला आहे
या कंपनी परिसरात सुरक्षेच्या नियमांचे तीन तेरा
एम्बॉयो कंपनीमध्ये सुरक्षा नियमांचे तीनतेरा वाजवल्याचे या घटनेतून दिसून आले. आग किरकोळ आहे असं कंपनी प्रशासनाकडून भासवले जात असले तरी प्रत्यक्ष दर्शन कडून आगीचे लोट आकाशात मोठ्या प्रमाणावर उडाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. रसायन कंपनीमध्ये वेल्डिंग करताना आग लागणे याचाच अर्थ सुरक्षा नियमांचे उल्लंघन या कंपनीने केल्याचे दिसून येत आहे. या वेल्डिंग कामामुळेच आग लागण्याचे कंपनी प्रशासनाकडून देखील मान्य केले गेले आहे एकंदरीत या कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही गांभीर्य घेतले नसल्याने आजची घटना घडली आहे अशी चर्चा औद्योगिक वसाहत परिसरातील कामगारांमध्ये ऐकण्यास मिळाली