महाड शहर आणि नडगाव गावाच्या परिसरात दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. या दोन्ही आगीच्या घटनेत मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील एक एक्स रे सेंटर आणि नडगाव मधील भंगार गोदामाचा यामध्ये समावेश आहे.
महाड. शहरातील रोहिदास नगर परिसरात प्रगती विराज दळवी यांच्या मालकीच्या आयकॉन डायग्नोसिस लॅबला रविवारी मध्य रात्री आग लागली. या आगीत लॅब मधील इलेक्ट्रॉनिक यंत्र, फर्निचर, कम्प्युटर एक्स-रे-मशनरी आदी सामान जळून खाक झाले.
यामध्ये दळवी यांचे जवळपास पस्तीस ते चाळीस लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या आगीच्या घटनेमध्ये नडगाव गावाजवळ असलेल्या कलाम या व्यक्तीच्या एका भंगार गोदामाला आग लागली. ही आग रविवारी संध्याकाळी पाच वाजता लागली. या गोदामाच्या बाजूला असलेल्या कंपनीला लागणाऱ्या पॅलेट बनवणाऱ्या लघु व्यवसायिकाचे देखील नुकसान झाले.
त्याठिकाणी असलेला लाकडी भुसा जळून खाक झाल्याने सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याचे शाम सुरेश गुडेकर यांनी सांगितले. या आगीत भंगार गोदामा चे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही घटनानंतर अग्निशमन दलाने आग विझवून आग आटोक्यात आणली.
महाड शहरातील रोहिदास नगर मधील स्थानिक लोकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी दरवाजा तोडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे येथील रहिवाशी विराज दळवी यांनी सांगितले.