शहरातील श्रीकाळ भैरवनाथ देवस्थान उत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही खाजगी आणि सार्वजनिक दहीहंडया फोडण्याचे एक नियमबध्द नियोजन करण्यात आले. या नियोजनानुसारच शहरातील 25 दहीहंडी फोडण्याची संधी शहरातील 13 नगरांना देण्यात आली.
विविध शहरात आणि गावांमध्ये मोठमोठया रकमा आणि दहीहंडी फोडण्यासाठी जीवघेणी स्पर्धा दिसून येत असताना पोलादपूर शहरात महत्व ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थान उत्सव मंडळातर्फे ही हंडी कोणत्या नगरातील गोविंदांनी फोडायची याबाबत आधीच नियोजन केले जाते. त्यानुसार यंदा जाखमाता नगरने कृष्णा गायकवाड यांची हंडी व बाजारपेठ दिलीप साबळे यांची हंडी, गोकुळनगरने सैनिक नगर येथील हंडी शिवाजी नगर येथील हंडी, सैनिक नगरने शिवाजीनगर अशोक सुतार येथील हंडी व आनंदनगर येथील हंडी, साईनाथ नगरने सहदेव पांढरकामे यांची हंडी व मंगेश नगरकर यांची हंडी, तांबड भुवन मित्र मंडळाने सिध्देश्वर आळी यांची हंडी व परमानंद स्वामी मठातील हंडी, जोगेश्वरी गाडीतळाने कै.बी.एल.भोसले यांची हंडी व राधाकृष्ण मंदिर गोकुळनगर येथील हंडी, शिवाजी नगरने जोगेश्वरी गाडीतळ येथील हंडी व विवेक दीक्षित यांची हंडी, सिध्देश्वर आळीने साईनाथ नगर येथील हंडी व तांबड भुवन मित्र मंडळ येथील हंडी, स्वामी परमानंद मठ गल्ली मंडळाने कै.चंद्रकांत कासुर्डे बाजारपेठ येथील हंडी व जाखमाता नगर येथील हंडी, आनंद नगरने शिवाजी नगर स्वराज आकाश यांची हंडी व सैनिक नगर महिला मंडळ यांची हंडी, भैरवनाथ नगराने पोलीस स्टेशन येथील हंडी, महिला मंडळाने भैरवनाथ नगर येथील हंडी व प्रशांत शेठ यांची हंडी, काळभैरवनाथनगराने कै.पालकर यांची हंडी व सिध्देश संजय शेठ यांची हंडी असे नियोजन दिवसभरात यशस्वी करण्यात आले.
शहरातील दहीहंडी उत्सवामध्ये चार थरांची दहीहंडी लावण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली असून दुपारी दोन वाजता ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरापासून शहरातील सर्व नगरांमधील गोविंदांनी हंडी फोडण्यास सुरुवात केली. राजकीय पक्षांची चिन्हे अथवा व्यक्तींच्या नावाने बनियान अथवा टी-शर्ट परिधान करू नये, नशापाणी करू नये, गोविंदांवर कुठल्याही प्रकारचे घातक रंग टाकू नये अशा प्रकारचे नियम निश्चित करण्यात आलेल्या पोलादपूर शहरातील दहीहंडी फोडण्याचा हा उत्सव एकाच वेळी सर्व नगरातील गोविंदांच्या सहभागाने पूर्ण होतो. मात्र, बांधण्यात आलेल्या प्रत्येक दहीहंडी सोबत बक्षिसाची रक्कम श्री काळभैरवनाथ देवस्थान पोलादपूर यांच्या पंचकमिटी कडे जमा करण्यात येते. नियमबध्द नियोजन असलेला पोलादपूर शहंरातील हा दहीहंडी गोविंदा उत्सव यंदाही शांततापूर्ण उत्साहात साजरा झाला.
यावेळी यंदाचे गोविंदा उत्सव कमिटीचे अध्यक्ष उमेश सवादकर आणि देवस्थान कमिटीचे सरपंच बाबुराव महाडीक तसेच देवस्थान खजिनदार दिनेश पाटील यांनी पोलादपूरकरांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.