पनवेल शहर पोलिसांची ८ जणांविरोधात धडक कारवाई

Police Thane Panvel
पनवेल ( संजय कदम ) : बेकायदेशीर रित्या अंमली पदार्थाचे सेवन करणे, जवळ बाळगणे त्याचप्रमाणे देशी विदेशी मद्यसाठा करणाऱ्यां ८ जणांविरोधात धडक कारवाई केली आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्ववभूमीवर कोणताही अनुचित प्रकार हद्दीत घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत आदींनी विशेष नियोजन केले होते.
यावेळी हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशन परिसर, एसटी स्टॅन्ड परिसर, शिरढोण पाडा परिसर, ओरियन मॉल परिसर आदी ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस उपनिरीक्षक अभय शिंदे, पोलीस हवालदार अमोल पाटील, परेश म्हात्रे, झांझम, पोलीस नाईक जगताप, पारधी, पोलीस शिपाई नितीन कांबळे, विशाल दुधे, प्रसाद घरत आदींच्या पथकाने सदर वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून देशी विदेशी मद्य साठा जवळ बाळगणारे त्याचप्रमाणे विनापरवाना अंमली पदार्थाचे सेवन करणे, तसेच जवळ बाळगल्याप्रकरणी ८ जणांवर कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *