पनवेल जवळील भंगारपाडा येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने खेचून घेऊन पळ काढणाऱ्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी चेनस्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या ६ तासात अटक केली आहे.
फिर्यादी नामे मंजुळा हरिचंद्र दबडे (वय 55 वर्षे, रा. पारगाव, दापोली) या भंगारपाडा येथे रोडने पायी जात असताना, एका अनोळखी आरोपीने फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने खेचून घेऊन पळ काढला. या बाबत पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज तसेच तांत्रिक तपास करून पाहिजे आरोपीचे नाव निष्पन्न करून त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून सदर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.